Gajakesari Yoga : वसंत पंचमी गजकेसरी योगाच्या वेळी येत आहे. या दिवशी गुरु-चंद्राचा दुर्मिळ संयोग गजकेसरी योग तयार करत आहे. त्यामुळे 4 राशींचा फायदा होणार आहे. त्या कोणत्या, ते जाणून घेऊ.
पंचमी गजकेसरी योगाच्या वेळी येत आहे. या दिवशी गुरु-चंद्राच्या संयोगाने गजकेसरी योग तयार होत आहे. 23 जानेवारीला चंद्र मीन राशीत आणि गुरु कर्क राशीत असेल. हा योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जातो.
25
मेष रास
नोकरी आणि व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. आर्थिक निर्णय खूप फायदेशीर ठरू शकतात. कर्जाचे ओझे आणि अनियंत्रित खर्चातून तुमची सुटका होईल. गुंतवणुकदारांसाठीही हा काळ अनुकूल राहील.
35
कर्क रास
करिअर किंवा व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारताना दिसत आहे. सहज पैसा मिळू शकतो. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
55
मीन रास
तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बँक बॅलन्स वाढेल. उत्पन्नात वाढ झाल्याची चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. कुटुंबात आणि समाजात संबंध चांगले राहतील.