मोदक म्हणजे स्वर्गीय सुख. फक्त खाण्याचेच नव्हे तर प्रसादासाठी मोदक बनविण्याचे सुखही वेगळेच असते. पण या मोदकांना कुरकुरीतपणा कसा आणायचा हे खरे आव्हान असते. तर जाणून घ्या...
घरच्या घरी मोदक बनवायला महिलांना खूप आवडते, पण ते कुरकुरीत कसे करायचे हीच चिंता असते. म्हणून आज आपण जाणून घेऊ या की मोदक कुरकुरीत, चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट कसे बनवावे.
गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात मोदक बनवले जातात. गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात, म्हणूनच सणाच्या दिवशी २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. मोदक अनेक प्रकारे तयार केले जातात. उकडीचे मोदक, तळलेले मोदक, चॉकलेट मोदक, ड्रायफूट मोदक फार प्रसिद्ध आहेत.
25
मोदक करण्याची पद्धत
पोळी बनवण्यासाठी : १०० ग्रॅम चिरोटी रवा, २ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तूप, चिमूटभर मीठ घ्यावे. सुरुवातीला पाणी न घालता मिसळून घ्यावे. हळूहळू पाणी घालून पिठ मळून घ्यावे. वरून थोडासा मैदा भुरभुरवून ठेवावा.
35
सारण तयार करण्यासाठी :
कढईत १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात थोडे काजू-बदाम घालून परतावे.
मग किसलेले नारळ घालून हलवावे.
त्यात गुळ घालावा. दोन मिनिटांत गुळ पाणी सोडेल. अजून पाणी घालू नये.
नंतर १ टेबलस्पून चिरोटी रवा टाकल्यास सारण घट्ट आणि छान होते.