
अल्झायमरमुळे स्मरणशक्ती पूर्णपणे बिघडते. अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्यक्तीला विसरभोळेपणा येऊ शकतो. विस्मरणाच्या धोक्याची चिन्हे लवकर ओळखणे आणि वेळेवर निदान करणे हे महत्त्वाचे घटक आहेत. 60 वर्षांवरील लोकांमध्ये याची लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येतात.
रोजची कामे, अनेक वर्षांपासून करत असलेली कामे व्यवस्थित करता न येणे, स्वतःचा पत्ता किंवा फोन नंबर विसरणे, वस्तू कुठे ठेवल्या हे विसरणे, बोलताना एका विषयावर लक्ष केंद्रित करता न येणे, सांगितलेल्या गोष्टी पुन्हा सांगणे, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणे, वर्ष, तारीख, दिवस विसरणे, स्थळ-काळाचे भान नसणे, भावनिक वर्तणुकीतील समस्या, संवाद साधण्यात अडचळे येणे ही सर्व या आजाराची लक्षणे आहेत.
अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत, हे जाणून घेऊया.
1. उच्च फ्रक्टोज
उच्च फ्रक्टोज म्हणजेच साखरयुक्त पदार्थ, कॉर्न सिरपसारखे सिरप, आणि इतर साखरयुक्त पेये यांच्या अतिसेवनाने अल्झायमरचा धोका वाढू शकतो. याशिवाय, जास्त कॅलरीज आणि फायबरच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोज वाढते आणि वजनही वाढते. त्यामुळे यांचे सेवन शक्यतो टाळावे.
2. फ्रेंच फ्राईज
बर्गर आणि सॉससोबत साईड डिश म्हणून अनेकजण फ्रेंच फ्राईज खातात. फ्रेंच फ्राईजमधील बटाट्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढते आणि शरीरातील सूज वाढते. याच्या अतिसेवनाने भविष्यात अल्झायमरचा धोका वाढू शकतो.
3. सीड ऑईल
सूर्यफूल तेल, करडईचे तेल यांसारख्या तेलांच्या अतिवापरामुळेही अल्झायमरचा धोका वाढू शकतो.
टीप: वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच आजाराची पुष्टी करा.