उन्हाळ्यात स्ट्रोकचा धोका टाळायचाय? मग हे 5 प्रकारचे ज्यूस नक्की प्या, हेल्थ बनेल वेल्थ

Published : Mar 19, 2026, 10:50 AM IST

Five Healthy Drinks to Reduce Stroke Risk : स्ट्रोकमुळे मेंदूवर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे अपंगत्व येऊ शकतं. काहीवेळा तर मृत्यूचा धोकाही असतो. पण आहारात काही खास पेयांचा समावेश करून तुम्ही स्ट्रोकचा धोका टाळू शकता.

PREV
15
बीटचा रस
बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.
25
सिट्रस ज्यूस
सिट्रस फळांच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. तुम्ही संत्री किंवा ग्रेपफ्रूटचा रस पिऊ शकता. यातील पोषक तत्त्वांमुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.
35
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे रक्तप्रवाह सुधारण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. यामुळे स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
45
डाळिंबाचा रस
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
55
बेरी स्मूदी
ही स्मूदी चवीला उत्तम तर आहेच, पण तिचे अनेक फायदेही आहेत. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करतात.
Read more Photos on

Recommended Stories