Festive Shopping EMI : सणासुदीला ईएमआयवर खरेदी करताय? खिशाला कात्री लागू देऊ नका

Published : Oct 20, 2026, 01:39 PM ISTUpdated : Oct 20, 2026, 01:43 PM IST
6 online shopping changes from january 1 2027

सार

दसरा आणि दिवाळी आली की नवीन गाड्या, टीव्ही, मोबाईलपासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर भन्नाट डिस्काउंट आणि सोपे कर्ज मिळतात. पण या ऑफर्सच्या नादात बजेट कोलमडणार नाही, याची काळजी घ्या.

मुंबई : दसरा-दिवाळी आली की बाजारात ऑफर्सचा महापूर येतो. नवीन गाड्या, टीव्ही, मोबाईलपासून ते अगदी सोन्याच्या दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर भन्नाट डिस्काउंट आणि सहज मिळणारे कर्ज उपलब्ध असते. 'झिरो डाऊन पेमेंट', 'नो-कॉस्ट ईएमआय', 'बाय नाऊ, पे लेटर' आणि मोबाईलवर अवघ्या काही मिनिटांत मिळणारे इन्स्टंट पर्सनल लोन... या सगळ्या गोष्टी सामान्य ग्राहकांना खूप आकर्षक वाटतात. पण या भूलथापांना बळी पडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे:

१. छोट्या ईएमआयचा मोठा सापळा

महिन्याला फक्त एक-दोन हजार रुपयेच तर भरायचेत, असा विचार करून आपण सणासुदीच्या उत्साहात तीन-चार नवीन वस्तू ईएमआयवर घेतो. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा हे सगळे हप्ते एकत्र येतात, तेव्हा पगारीचा मोठा हिस्सा फक्त ईएमआय भरण्यातच जातो. त्यामुळे तुमच्या एकूण उत्पन्नाच्या ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या हप्त्यांमध्ये जाणार नाही, याची काळजी घ्या.

२. 'नो-कॉस्ट ईएमआय' खरंच फ्री असतो का?

दुकानदार 'नो-कॉस्ट ईएमआय'च्या कितीही बाता मारत असले, तरी बहुतांश वेळा प्रोसेसिंग फी आणि त्यावरचा जीएसटी ग्राहकांच्याच माथी मारला जातो. जर तुम्ही पूर्ण पैसे देऊन रोख खरेदी केली, तर मिळणारा कॅश डिस्काउंट ईएमआयवर खरेदी केल्यास मिळत नाही. म्हणजेच, डिस्काउंट गमावून तुम्ही अप्रत्यक्षपणे व्याजच भरत असता.

३. 'मिनिमम ड्यु' भरण्याच्या मोहात पडू नका

सणासुदीच्या खरेदीचे बिल वाढले की अनेक जण क्रेडिट कार्डचे फक्त 'मिनिमम ड्यु' भरून मोकळे होतात. पण उरलेल्या रकमेवर वार्षिक ३६ ते ४५ टक्क्यांपर्यंत भरमसाठ व्याज लागते. हे तुम्हाला नकळत कर्जाच्या मोठ्या खाईत ढकलते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना नेहमी वेळेवर पूर्ण बिल भरण्याची क्षमता असेल, तरच त्याचा वापर करणे शहाणपणाचे ठरते.

४. सिबिल स्कोरवर होणारा परिणाम

छोट्या-मोठ्या कर्जांसाठी वेगवेगळ्या वेबसाइट्सवर सतत अर्ज करणे आणि नंतर हप्ते भरण्यास उशीर करणे, यामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब होतो. एकदा का हा स्कोर घसरला, की भविष्यात घर घेण्यासाठी किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी बँकांकडून योग्य व्याजदरात कर्ज मिळवणे खूप कठीण होऊन बसते.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Best Mobile Under 15000 : 15 हजारांत सुपर 5G मोबाईल, नवा फोन घेणाऱ्यांसाठी बेस्ट ऑफर
Post Office SCSS : रिटायरमेंटनंतर दरमहा 10000 हून अधिक कमवा, सरकारची योजना नेमकी काय? फायदे काय?