
मुंबई : स्ट्रॉंग हायब्रिड कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत एक ताकदवान इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी दिलेली असते. माईल्ड हायब्रिडपेक्षा ही कार वेगळी असते. कमी वेगात ती फक्त इलेक्ट्रिक पॉवरवर धावू शकते आणि विशेष म्हणजे, तिला बाहेरून चार्ज करण्याची गरज नसते. तुम्ही गाडी चालवत असताना ती स्वतःची बॅटरी आपोआप चार्ज करते.
जर तुमचा रोजचा प्रवास ट्रॅफिकमधून होत असेल, तर ही कार तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. खाली आपण पाहणार आहोत की स्ट्राँग हायब्रिड कार कशी काम करते, ती इतर हायब्रिड गाड्यांपेक्षा कशी वेगळी आहे आणि ती कोणी घ्यावी किंवा घेऊ नये.
स्ट्रॉंग हायब्रिडला 'फुल हायब्रिड' असंही म्हणतात. यातली इलेक्ट्रिक मोटर एवढी ताकदवान असते की ती एकटीच गाडीची चाकं फिरवू शकते. ट्रॅफिक सिग्नलवर, संथ गतीने चालणाऱ्या ट्रॅफिकमध्ये किंवा गाडी एकाच वेगात चालत असताना पेट्रोल इंजिन पूर्णपणे बंद होतं.
हाच यातला 'स्ट्रॉंग' भाग आहे. माईल्ड हायब्रिडमध्ये खूप छोटी मोटर असते, जी फक्त इंजिनला मदत करते आणि त्यात इंजिन कधीच बंद होत नाही. पण स्ट्रॉंग हायब्रिड कार प्रवासातील काही अंतर पूर्णपणे विजेवर कापू शकते.
यातली बॅटरी छोटी असते, साधारण १.५ kWh पेक्षा कमी क्षमतेची. इंजिन आणि ब्रेक लावण्याच्या प्रक्रियेतून ती चार्ज होते. म्हणूनच याला चार्जिंग केबलची गरज नसते आणि चार्जिंग स्टेशन शोधत बसावं लागत नाही.
मुख्य भाग
यातले चार मुख्य भाग सगळ्यात जास्त काम करतात:
या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारा एक कॉम्प्युटर असतो. तो एका सेकंदात अनेक वेळा ठरवतो की गाडी चालवण्यासाठी इंजिन वापरायचं की बॅटरी.
एका नेहमीच्या प्रवासाचा विचार करा:
थांबत-चालत जाणाऱ्या ट्रॅफिकमध्ये याचा सर्वात जास्त फायदा होतो. साधी गाडी ट्रॅफिकमध्ये उभी असताना उगाच पेट्रोल जाळते, पण स्ट्रॉंग हायब्रिड कार अशा वेळी इंजिन थेट बंदच करते.
जेव्हा तुम्ही ॲक्सिलरेटरवरून पाय काढता किंवा ब्रेक दाबता, तेव्हा मोटर उलट्या दिशेने फिरते आणि जनरेटरसारखं काम करते. जुन्या सायकलवरच्या डायनॅमोची आठवण करा: चाक फिरलं की डायनॅमो वीज तयार करायचा. गाडीतही अगदी असंच होतं. ब्रेक लावताना जी ऊर्जा वाया जाते, तिचं रूपांतर बॅटरी चार्ज करण्यासाठी केलं जातं.
यामुळेच हायब्रिड गाड्यांचे ब्रेक पॅड्स जास्त काळ टिकतात. कारण ब्रेक पॅड्सचा वापर होण्याआधीच मोटर गाडीचा वेग बऱ्यापैकी कमी करते.
जे लोक रोज शहरातल्या ट्रॅफिकमधून प्रवास करतात, त्यांच्यासाठी इंधनाची बचत आणि स्मूथ ड्रायव्हिंग हे जास्त किमतीपेक्षा नक्कीच फायद्याचं ठरतं. पण जर तुमचा प्रवास जास्त करून मोकळ्या हायवेवर असेल किंवा तुम्ही गाडी खूप कमी चालवत असाल, तर साधी पेट्रोल कार तुमच्यासाठी जास्त योग्य ठरेल.
भारतात स्ट्रॉंग हायब्रिड गाड्यांची संख्या अजूनही कमी असली, तरी पर्याय वाढत आहेत. येथे त्यापैकी पाच गाड्यांची कागदावर कशी तुलना होते ते पाहा:
| कार | बॉडी टाईप | हायब्रिड इंजिन | गिअरबॉक्स | ARAI मायलेज (दावा केलेलं) |
|---|---|---|---|---|
| रेनो डस्टर (हायब्रिड ई-टेक १६०) | SUV | १.८-लिटर पेट्रोल आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्स | मल्टी-मोड ऑटोमॅटिक | २९ किमी/लिटर |
| मारुती सुझुकी व्हिक्टोरिस | SUV | १.५-लिटर पेट्रोल | e-CVT | २८.६५ किमी/लिटर |
| मारुती सुझुकी ग्रँड विटारा | SUV | १.५-लिटर पेट्रोल | e-CVT | २७.९७ किमी/लिटर |
| टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर | SUV | १.५-लिटर पेट्रोल | e-CVT | २७.९७ किमी/लिटर |
जर तुमचा रोजचा प्रवास ट्रॅफिकमधून आणि कमी अंतराचा असेल, तर तुमची गाडी चालवण्याची पद्धत न बदलता स्ट्रॉंग हायब्रिड कार तुमच्या इंधनाचा खर्च नक्कीच कमी करू शकते. रेनोसारख्या ऑटोमोबाईल कंपन्या नवीन डस्टर HEV सोबत त्यांचं ई-टेक हायब्रिड तंत्रज्ञान भारतात आणत आहेत. या सिस्टीममुळे शहरातील जवळपास ८० टक्के प्रवास इलेक्ट्रिक मोडवर होऊ शकतो.
कोणतीही गाडी घेण्यापूर्वी तुमच्या रोजच्या ट्रॅफिकमध्ये तिची टेस्ट ड्राईव्ह नक्की घ्या, यातून तुम्हाला ब्रोशरपेक्षा जास्त माहिती मिळेल. आणि लक्षात ठेवा, ट्रॅफिकमध्येच स्ट्रॉंग हायब्रिड कार तिची खरी किंमत वसूल करून देते.