शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! थेट 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान, जाणून घ्या केंद्र सरकारची नवी योजना

Published : Jan 27, 2026, 03:38 PM IST

Farmer Scheme : केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया योजनेत मोठा बदल केला आहे. यानुसार, आता वैयक्तिक तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रक्रिया युनिट, तेलघाणा आणि गोदाम उभारणीसाठी थेट अनुदान मिळणार आहे. 

PREV
16
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!

Farmer Scheme : तेलबिया पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया या योजनेअंतर्गत आता केवळ संस्था नव्हे, तर वैयक्तिक शेतकरीही थेट आर्थिक मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेतून तेलबिया प्रक्रिया युनिट, तेलघाणा, प्लांट आणि गोदाम उभारणीसाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

यापूर्वी काढणीपश्चात पायाभूत सुविधांचा लाभ फक्त सहकारी संस्था किंवा कंपन्यांनाच मिळत होता. मात्र आता सरकारने धोरणात बदल करत थेट शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

26
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

ही योजना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहे.

जे शेतकरी तेलबिया पिकांचे उत्पादन घेतात

किंवा तेलबियांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छितात

अशा शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. 

36
अनुदान किती मिळणार?

केंद्र सरकारकडून

तेलबिया प्रक्रिया युनिट

लहान व मध्यम तेल प्रक्रिया प्लांट

तेलघाणा केंद्र

गोदाम व साठवण सुविधा

काढणीपश्चात उपयोगी उपकरणे

यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा जास्तीत जास्त 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. 

46
पात्रता व आवश्यक अटी

अर्जदार हा वैयक्तिक शेतकरी असावा

तेलबिया पिकांचे उत्पादन किंवा प्रक्रिया उपक्रम करण्याचा उद्देश असावा

प्रकल्पासाठी आवश्यक स्वतःची जमीन किंवा वैध भाडेकरार असणे गरजेचे

शासनाने ठरवलेले तांत्रिक व आर्थिक निकष पूर्ण करणे आवश्यक 

56
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड)

जमिनीचे कागदपत्र

बँक खाते तपशील

शेतकरी ओळख क्रमांक

प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल

स्थानिक प्राधिकरणाची मंजुरी

66
अर्ज कसा आणि कुठे करायचा?

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावा. सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories