EPFO WhatsApp Channel : ईपीएफओची भारी ऑफर; आता व्हॉट्सॲपवरच मिळणार पीएफ आणि पेन्शनचे अपडेट्स, पाहा कसं?

Published : Oct 20, 2026, 05:41 PM IST

EPFO ने नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओने आता व्हॉट्सॲपवर आपलं अधिकृत चॅनेल सुरू केलं आहे. यामुळे आता पीएफ, पेन्शन आणि ईडीएलआय (EDLI) योजनांचे सर्व अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर मोफत मिळतील.

PREV
16
व्हॉट्सॲपवर आलंय EPFO चॅनेल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खाजगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी एक नवीन डिजिटल सुविधा आणली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन आणि इन्शुरन्ससारख्या महत्त्वाच्या सेवांची माहिती देण्यासाठी संस्थेने एक अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलच्या मदतीने आता प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनवर पीएफची माहिती अगदी सहज मिळवू शकतो.

या नवीन सुविधेमुळे सबस्क्रायबर्सना महत्त्वाचे नोटिफिकेशन्स, डेडलाईन्स, पीएफ नियमांमधील बदल आणि नवीन योजनांची माहिती थेट व्हॉट्सॲपवरच मिळेल. विशेष म्हणजे, हे चॅनेल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच फॉलोअर्सची संख्या २ लाखांच्या पुढे गेली आहे.

26
व्हॉट्सॲप चॅनेलवर मिळतील या प्रमुख सेवा

ईपीएफओ आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलवर प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या योजनांचे अपडेट्स देत आहे..

• ईपीएफ (EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड): दर महिन्याला खात्यात जमा होणारी पीएफ रक्कम, आणीबाणीच्या वेळी खात्यातून पैसे काढण्याची किंवा ॲडव्हान्स घेण्याची पद्धत आणि इतर गोष्टींचे नोटिफिकेशन्स इथे मिळतील.

• ईपीएस (EPS - एम्प्लॉईज पेन्शन स्कीम): निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनचे नियम आणि नवीन नोटिफिकेशन्सची माहिती दिली जाते.

• ईडीएलआय (EDLI - एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स): कर्मचाऱ्यांना मिळणारा मोफत जीवन विमा आणि त्याच्या क्लेम प्रक्रियेची माहिती इथे शेअर केली जाते.

या तिन्ही गोष्टींसोबतच कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केले जाणारे ग्रीव्हन्स कॅम्प आणि महत्त्वाच्या तारखांचे अपडेट्सही वेळोवेळी मेसेजद्वारे मिळतील.

36
पीएफ काढण्याची पद्धत आणि नियम समजून घेण्यासाठी सोपे व्हिडिओ

पीएफचे नियम सहसा लवकर समजत नाहीत, त्यामुळे अनेकजण गुगलवर माहिती शोधत असतात. हा त्रास वाचवण्यासाठी या व्हॉट्सॲप चॅनेलवर माहितीसोबतच संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारे व्हिडिओ आणि ट्युटोरियल्स पोस्ट केले जात आहेत.

पीएफ खात्यातून ॲडव्हान्स पैसे कसे काढायचे, एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत गेल्यावर नियम कसे बदलतात, यासोबतच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची संपूर्ण माहिती व्हिडिओ लिंक्सद्वारे दिली जात आहे. यामुळे किचकट नियमही अगदी सहज समजतात.

46
व्हॉट्सॲपवरून थेट पीएफचे पैसे काढता येतील का?

इथे सबस्क्रायबर्सनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ईपीएफओचं व्हॉट्सॲप चॅनेल फक्त कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अपडेट्स देण्यासाठी बनवलं आहे.

तुम्ही व्हॉट्सॲपवरून थेट तुमचा पीएफ बॅलन्स चेक करू शकत नाही, क्लेम फॉर्म भरू शकत नाही किंवा ॲडव्हान्स पैशांसाठी अर्ज करू शकत नाही. या कामांसाठी सदस्यांना नेहमीप्रमाणे ईपीएफओचं अधिकृत वेब पोर्टल, उमंग (Umang) मोबाईल ॲप किंवा जवळच्या प्रादेशिक पीएफ ऑफिसशीच संपर्क साधावा लागेल.

56
तुमच्या मोबाईलवर ईपीएफओ व्हॉट्सॲप चॅनेल कसं जॉईन करायचं?

तुमच्या व्हॉट्सॲपवर ईपीएफओ चॅनेल फॉलो करणं खूप सोपं आहे. खालील स्टेप्स फॉलो करा..

१. तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी WhatsApp ॲप ओपन करा.

२. ॲपमध्ये खाली किंवा वर दिसणाऱ्या Updates टॅबवर जा.

३. तिथे Channels च्या खाली असलेल्या Explore पर्यायावर क्लिक करा.

४. वरच्या सर्च बारमध्ये EPFO असं टाईप करा.

५. EPFO चं अधिकृत चॅनेल ओळखा आणि बाजूला असलेल्या Follow बटणावर क्लिक करा.

यानंतर संस्था शेअर करत असलेली प्रत्येक माहिती तुम्हाला थेट व्हॉट्सॲपवर नोटिफिकेशनच्या रूपात दिसेल.

66
कंपन्या आणि मालकांसाठी ईपीएफओची सवलत

दुसरीकडे, व्यावसायिक संस्था आणि कंपन्यांसाठीही ईपीएफओने एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे. सप्टेंबर २०२६ साठी इलेक्ट्रॉनिक चलान-कम-रिटर्न (ECR) जमा करण्याची शेवटची तारीख आधी १५ ऑक्टोबर होती, ती आता ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पगाराच्या मर्यादेत बदल झाल्यामुळे, कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ, पेन्शन आणि इन्शुरन्सची माहिती अचूकपणे नोंदवण्यासाठी अतिरिक्त वेळेची गरज आहे, हे लक्षात घेऊन ईपीएफओने ही सवलत दिली आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories