Electric Scooter: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, झेलो इलेक्ट्रिकने (Zelo Electric) 'नाइट प्लस राणी एडिशन' ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर 100 किमीची रेंज देते आणि महिलांना आकर्षित करणाऱ्या खास गुलाबी रंगात उपलब्ध आहे.
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ वेगाने वाढत आहे आणि त्यात सतत नवीन मॉडेल्स येत आहेत. याचंच पुढचं पाऊल म्हणजे झेलो इलेक्ट्रिकने (Zelo Electric) एक खास लिमिटेड एडिशन स्कूटर आणली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाँच झालेल्या या मॉडेलचं नाव 'नाइट प्लस राणी एडिशन' (Knight Plus Rani Edition) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ₹69,990 ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच्या फक्त 999 युनिट्सच तयार केल्या जाणार आहेत. नाइट प्लस मॉडेलवर आधारित असलेली ही राणी एडिशन स्कूटर महिलांचा आत्मविश्वास आणि वेगळेपण सेलिब्रेट करते. कंपनीने म्हटलंय की, शहरातल्या प्रवासासाठी हा एक सोपा आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. या स्कूटरला खास गुलाबी रंगात पांढऱ्या पॅनलसोबत डिझाइन केलं आहे, ज्यामुळे ती खूपच स्टायलिश दिसते. यात 1.8 kWh क्षमतेची पोर्टेबल LFP बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर सुमारे 100 किलोमीटरपर्यंत धावते, असा कंपनीचा दावा आहे.
22
फीचर्स
या स्कूटरमध्ये 1.5 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आहे, ज्यामुळे ती ताशी 55 किमीचा सर्वाधिक वेग गाठू शकते. शहरातील रोजच्या प्रवासासाठी हा वेग अगदी योग्य आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात काही आधुनिक सुविधा दिल्या आहेत. यामध्ये हिल होल्ड कंट्रोल (Hill Hold Control), क्रूझ कंट्रोल (Cruise Control), फॉलो मी होम हेडलाइट्स (Follow Me Home Headlights), यूएसबी चार्जिंग पोर्ट (USB Charging Port) आणि पोर्टेबल बॅटरी यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. ज्या ग्राहकांना हे मॉडेल खरेदी करायचं आहे, ते झेलो कंपनीच्या अधिकृत डीलरशिप केंद्रांवर जाऊन बुकिंग करू शकतात.