नारळाच्या करवंटीची युक्ती...
तुमच्या घरी नारळाच्या करवंट्या असतील तर त्यांच्या मदतीनेही तुम्ही घर थंड ठेवू शकता. एका प्लास्टिकच्या डब्यात करवंट्या ठेवा आणि त्यात पाणी घालून बर्फ होईपर्यंत ठेवा. बर्फ झाल्यावर त्या टेबल फॅनसमोर ठेवा. यामुळेही खोली थंड होते.
इतर उपाय:
सुती चादरी: जमिनीवर सुती चादरी अंथरा. यामुळे खोलीतील उष्णता कमी होते.
मातीच्या भांड्यात पाणी: खोलीत मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने खोलीत गारवा राहतो.
खसच्या चादरी आणि पडदे: बाजारात खसच्या चादरी सहज मिळतात. त्या खिडक्यांना आणि दारांना लावा. यामुळे बाहेरून येणारी उष्णता कमी होते.