
मॉर्गेज लोनसाठी अप्लाय करताना योग्य डॉक्युमेंट्स जवळ असली की काम झटपट होतं आणि पडताळणीत अजिबात वेळ जात नाही. तुमची ओळख, इन्कम, कर्ज फेडण्याची क्षमता आणि तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीची कायदेशीर मालकी तपासण्यासाठी लेंडर्स अनेक कागदपत्रांची तपासणी करतात.
लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हा मॉर्गेज लोनचाच एक प्रकार आहे. यामध्ये पात्र प्रॉपर्टी मालक त्यांच्या स्वतःच्या निवासी किंवा व्यावसायिक प्रॉपर्टीवर निधी उभा करू शकतात. या लोनमध्ये प्रॉपर्टी तारण ठेवली जात असल्याने, लोन मंजूर करण्यापूर्वी लेंडर्स कर्जदाराची आर्थिक स्थिती आणि प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स या दोन्ही गोष्टी तपासतात.
मॉर्गेज लोनसाठी कोणती कागदपत्रं लागतात आणि लेंडर्स ती का तपासतात, हे समजून घेतलं तर तुम्हाला अप्लिकेशन तयार करणं सोपं जाईल. यामुळे अपूर्ण माहितीचा त्रास टळेल आणि पडताळणीत होणारा उशीरही वाचेल.
मॉर्गेज लोनसाठी लागणार कागदपत्रं ही लोनचा प्रकार, अर्जदाराची नोकरी किंवा बिझनेस प्रोफाईल आणि तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीवर अवलंबून असतात. बजाज फायनान्सकडून लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स द्यावी लागू शकतात:
पगारदार आणि व्यावसायिक अर्जदारांसाठी या अटी थोड्या वेगळ्या असू शकतात. पगारदार व्यक्तींना सॅलरी स्लिप्स आणि नोकरीचा पुरावा द्यावा लागतो, तर व्यावसायिकांना इन्कम टॅक्स रिटर्न, आर्थिक स्टेटमेंट्स आणि बिझनेस रेकॉर्ड्स द्यावे लागतात. पण प्रॉपर्टी मालकीचे डॉक्युमेंट्स दोघांसाठीही सारखेच महत्त्वाचे असतात.
तुमची आर्थिक स्थिती, प्रॉपर्टीची माहिती आणि पडताळणी प्रक्रियेतून समोर आलेल्या गोष्टींनुसार लेंडर तुमच्याकडे आणखी काही डॉक्युमेंट्स मागू शकतो. त्यामुळे अप्लाय करण्यापूर्वी डॉक्युमेंट चेकलिस्ट नक्की तपासा.
अर्जदाराची ओळख, त्याची आर्थिक स्थिती आणि प्रॉपर्टीवर त्याचा असलेला कायदेशीर हक्क अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी तपासण्यासाठी लेंडर्स या कागदपत्रांची छाननी करतात.
| डॉक्युमेंटचा प्रकार | लेंडर काय तपासतो | हे का महत्त्वाचं आहे |
|---|---|---|
| ओळख आणि पत्त्याचे रेकॉर्ड्स | अर्जदाराची ओळख आणि सध्याचा राहता पत्ता | नो युवर कस्टमर (KYC) पडताळणीसाठी. |
| इन्कम रेकॉर्ड्स | कमाई, इन्कमची स्थिरता आणि आर्थिक स्थिती | कर्ज फेडण्याची क्षमता तपासण्यासाठी. |
| बँक स्टेटमेंट्स | अकाऊंटमध्ये जमा होणारे पैसे, सध्याचे EMIs आणि ट्रान्झॅक्शन्स | आर्थिक जबाबदाऱ्या आणि कॅश फ्लो समजण्यासाठी. |
| प्रॉपर्टी टायटल डॉक्युमेंट्स | मालकी आणि प्रॉपर्टीमधील हितसंबंध | ही प्रॉपर्टी तारण म्हणून ठेवता येईल का, हे ठरवण्यासाठी. |
| प्रॉपर्टी अप्रूव्हल्स आणि रेकॉर्ड्स | मंजूर झालेलं बांधकाम आणि प्रॉपर्टीशी संबंधित इतर माहिती | प्रॉपर्टीची कायदेशीर पडताळणी करण्यासाठी. |
| बिझनेस रेकॉर्ड्स | व्यवसायाची उलाढाल आणि संबंधित आर्थिक माहिती | व्यावसायिकांच्या इन्कमचा अंदाज घेण्यासाठी. |
प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स सर्वात महत्त्वाचे असतात कारण ती प्रॉपर्टी तारण ठेवण्यासाठी कायदेशीररीत्या योग्य आहे की नाही हे लेंडरला ठरवावं लागतं. प्रॉपर्टी व्हॅल्युएशनवरून तिची किंमत समजते, पण त्यामुळे मालकी हक्क, टायटल आणि बोजा यांची कायदेशीर पडताळणी टळत नाही.
उदाहरणार्थ, एखाद्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू खूप जास्त असू शकते, पण जर तिचे मालकी हक्काचे रेकॉर्ड्स अपूर्ण असतील किंवा त्यावर आधीच कोणाचा दावा असेल, तर अधिक चौकशी करावी लागते. म्हणूनच लेंडर्स अर्जदाराच्या इन्कमसोबतच प्रॉपर्टीच्या कागदपत्रांचीही कसून तपासणी करतात.
अप्लाय करण्यापूर्वीच जर तुम्ही सगळी कागदपत्रं नीट तयार ठेवलीत, तर पडताळणीची प्रक्रिया जलद होते. यामुळे ऐनवेळी काही डॉक्युमेंट्स कमी पडल्यास वेळेवर त्याची जुळवाजुळव करता येते.
कागदपत्रं व्यवस्थित लावण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:
उदाहरणार्थ, जर तुम्ही अलीकडेच घर बदललं असेल, तर तुमच्या नवीन पत्त्याचा पुरावा लेंडरच्या नियमांत बसतोय का ते तपासा. तसंच, तुमच्या अर्जातील प्रॉपर्टीची माहिती उपलब्ध असलेल्या मालकी हक्काच्या रेकॉर्ड्सशी जुळत असल्याची खात्री करा.
डॉक्युमेंट्स आधीच तपासून घेतल्याने चुका लगेच लक्षात येतात आणि पडताळणीच्या वेळी होणारी धावपळ वाचते.
अपूर्ण, जुनी किंवा एकमेकांशी न जुळणारी कागदपत्रं दिल्यास मॉर्गेज लोन मंजूर होण्यास उशीर होऊ शकतो. अशा वेळी लेंडर पुढची प्रोसेस थांबवून तुमच्याकडे अधिक माहिती मागू शकतो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही अर्जात दिलेलं इन्कम आणि बँक स्टेटमेंटमध्ये दिसणारी रक्कम यात तफावत असेल, तर लेंडर अतिरिक्त पुरावे मागू शकतो. तसंच, प्रॉपर्टीचे रेकॉर्ड्स हरवले असतील किंवा कायदेशीर कागदपत्रं अपूर्ण असतील, तर प्रॉपर्टी तारण ठेवण्यापूर्वी त्याची सखोल पडताळणी केली जाते.
एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, तर त्याला दुसरा कोणता पर्याय चालू शकतो याबद्दल लेंडरशी संपर्क साधा. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे लोन प्रोसेस पुढे न्यायची की नाही, याचा निर्णय लेंडर घेतो.
हा उशीर टाळण्यासाठी, तुम्ही दिलेली सर्व कागदपत्रं स्पष्ट, पूर्ण आणि अर्जात दिलेल्या माहितीशी जुळणारी असल्याची खात्री करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळी कागदपत्रं दिली म्हणजेच लोन मंजूर होईल असं नाही. लेंडर तुमची पात्रता, परतफेडीची क्षमता आणि प्रॉपर्टीची कायदेशीर स्थिती तपासूनच अंतिम निर्णय घेतो.
आवश्यक कागदपत्रं जमा करणं हा मॉर्गेज लोन प्रक्रियेचा फक्त एक भाग आहे. केवळ कागदपत्रं दिली म्हणून लोन मिळेलच याची शाश्वती नसते. लेंडर तुमची पात्रता, कर्ज फेडण्याची क्षमता आणि प्रॉपर्टीची कायदेशीर स्थिती या सर्व गोष्टी तपासतो.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास, तुम्ही निवडलेलं लोन तुमच्या गरजा आणि परतफेडीच्या क्षमतेनुसार योग्य आहे की नाही हे ठरवणं सोपं जातं.
बजाज फायनान्स लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीच्या माध्यमातून पात्र प्रॉपर्टी मालक त्यांच्या स्वतःच्या निवासी किंवा व्यावसायिक प्रॉपर्टीवर वैयक्तिक किंवा बिझनेसच्या गरजांसाठी निधी उभा करू शकतात. यात प्रॉपर्टी तारण ठेवली जाते, पण नियमांच्या अधीन राहून तिची मालकी तुमच्याकडेच राहते.
अप्लाय करण्यापूर्वी, तुम्हाला किती रक्कम हवी आहे, व्याजदर काय असेल आणि परतफेडीचा कालावधी किती असेल याचा अंदाज घ्या, जेणेकरून या लोनचा तुमच्या बजेटवर काय परिणाम होईल ते स्पष्ट होईल.
बजाज फायनान्स लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीची मुख्य वैशिष्ट्ये:
व्याजदर, फी, परतफेडीच्या अटी आणि इतर नियम नीट समजून घेतल्यास तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीला साजेसं लोन अमाऊंट आणि टेन्युअर निवडता येईल.
थोडक्यात सांगायचं तर, मॉर्गेज लोन डॉक्युमेंट्समुळे लेंडर्सना तुमची आर्थिक स्थिती, परतफेडीची क्षमता आणि प्रॉपर्टीची कायदेशीर मालकी तपासता येते. तुमच्या लोन प्रकारानुसार कोणती कागदपत्रं लागतात याची माहिती असल्यावर लोन मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी होते.
बजाज फायनान्सकडून लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीसाठी अप्लाय करण्यापूर्वी डॉक्युमेंट चेकलिस्ट आणि पात्रतेच्या अटी नक्की वाचा, तसेच परतफेडीचे नियम समजून घ्या. कागदपत्रं आधीच तयार ठेवल्यास तुम्हाला बिनचूक अर्ज करता येईल आणि तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेता येईल.
तुमच्या प्रॉपर्टीवर फंड्स उभे करण्याचा विचार करताय? मग आजच बजाज फायनान्स लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीसाठी अप्लाय करा आणि तुमचे पर्याय तपासून पाहा.
*अटी आणि शर्ती लागू.