Diwali 2024 वेळी ट्रेडिंगसाठी NSE कडून अखेर मुहूर्त ठरला, महत्वही वाचा

Published : Oct 21, 2024, 12:24 PM ISTUpdated : Oct 21, 2024, 12:25 PM IST
Share Market Trading During Diwali

सार

Diwali 2024 Trading Muhurat : यंदाच्या दिवाळीवेळी शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या खास मुहूर्ताच्या ट्रेडिंग तारखेबद्दल कंफ्यूजन होते. अशातच 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबरला ट्रेडिंग केली जाणार याबद्दल NSE कडून अखेर स्पष्ट करण्यात आले आहे.

Diwali 2024 Trading Shubha Muhurat :  देशात दिवाळीच्या सणाची धूम सुरु झाली आहे. दिव्यांचा सण ओखळल्या जाणाऱ्या दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची खास परंपरा आहे. या क्षणाची प्रत्येक गुंतवणूकदाराकडून वाट पाहिली जाते. खरंतर, दिवाळीत शेअर मार्केटमध्ये खास मुहूर्तावर ट्रेडिंग करण्याची परंपरा आहे. यंदाच्या दिवाळीत ट्रेडिंग करण्याबद्दलचा दिवस कोणता असणार हे नॅशनल स्टॉक एक्सजेंच (NSE) कडून अखेर ठरवण्यात आला आहे. यंदा ट्रेडिंग 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबरला होणार याबद्दल कंफ्यूजन होते.

1 नोव्हेंबरच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग
BSE-NSE कडून 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या खास मुहूर्तावर एक तासांसाठी ट्रेडिंग केली जाणार आहे. सवंत 2081 ची सुरुवात झाल्यानंतर ट्रेडिंग संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत केली जाणार आहे. दोन्ही इंडेक्सने घोषणा केली आहे की, Stock Market ची प्री-ओपनिंग सेशन संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांपासून ते 6 वाजेपर्यंत असणार आहे.

ट्रेडिंगचे महत्व
दिवाळीवेळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची खास परंपरा आहे. खरंतर, दिवाळीवेळी शेअर मार्केट बंद असते. पण एक तासांसाठी विशेष रुपात खुले केले जाते. या एका तासाच्या वेळेत गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. अशी मान्यता आहे की, या दिवशी शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्याने समृद्धी येते. याशिवाय गुंतवणूकदारांवर संपूर्ण वर्षभर धनाचा वर्षाव होतो. दिवाळीवेळी ही ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करेंसी अँड कमोडिटी मार्केटमध्ये केली जाते.

पाच दशक जुनी परंपरा
शेअर मार्केटमध्ये दिवाळीवेळी केल्या जाणाऱ्या ट्रेडिंगची परंपरा आजची नव्हे तर पाच दशक जुनी आहे. मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा बीएसई (BSE) मध्ये वर्ष 1957 रोजी आणि NSE मध्ये 1992 रोजी सुरू झाली होती. तज्ज्ञ सांगतात की, मुहूर्तावर ट्रेडिंग करण्याची पद्धत परंपरेशी निगडीत आहे. बहुतांशजण या दिवशी शेअर्स खरेदी करतात.

आणखी वाचा : 

शेअर मार्केट वाढण्याची 5 मोठी कारणे, दिवाळीपूर्वी मार्केट का तेजीत?

2025 मधील केंद्र सरकारच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

PREV

Recommended Stories

Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार