तुम्ही रोज १०० रुपये म्हणजेच महिन्याला ३,००० रुपयांची बचत करून १२% वार्षिक चक्रवाढ (कंपाउंडिंग) परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केली, तर दीर्घकाळात एक मोठा फंड तयार होतो. पहिल्या १० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक ३,६०,००० रुपये होईल, त्यावर अंदाजे ३,३७,००० रुपये परतावा मिळून तुमचा एकूण फंड ६,९७,००० रुपयांपर्यंत पोहोचेल. हीच गुंतवणूक तुम्ही २० वर्षे चालू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक ७,२०,००० रुपये होईल.
कंपाउंडिंगच्या ताकदीमुळे तुमचा अंदाजित परतावा २२,७८,००० रुपयांपर्यंत वाढेल आणि तुमच्या हातात एकूण २९,९८,००० रुपये येतील. जर तुम्ही ३० वर्षांच्या दीर्घ कालावधीचा विचार केला, तर तुमची एकूण गुंतवणूक फक्त १०,८०,००० रुपये असेल, पण त्यावर तुम्हाला तब्बल ९४,२९,००० रुपये परतावा मिळेल. यामुळे तुमचा एकूण फंड १.०५ कोटी रुपये होईल आणि तुम्ही करोडपती व्हाल.