Escalator Safety: तुमची एक छोटीशी चूक ठरू शकते जीवघेणी, एस्केलेटर वापरताना ही काळजी नक्की घ्या

vivek panmand   | CMS
Published : Sep 24, 2026, 08:58 PM IST
Escalator Safety: तुमची एक छोटीशी चूक ठरू शकते जीवघेणी, एस्केलेटर वापरताना ही काळजी नक्की घ्या

सार

एस्केलेटरमुळे जिने चढण्या-उतरण्याचे कष्ट नक्कीच वाचतात. पण याचा वापर करताना थोडासा जरी निष्काळजीपणा केला, तर तुमची एक छोटीशी चूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.

मेट्रो स्टेशनपासून ते शॉपिंग मॉलपर्यंत आजकाल सगळीकडेच एस्केलेटर पाहायला मिळतात. वर-खाली जाण्यासाठी हा एक सोपा मार्ग असला, तरी वापरताना थोडं जरी लक्ष विचलित झालं तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्तींसोबत एस्केलेटर वापरताना जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

एस्केलेटर वापरताना कोणती काळजी घ्यावी?

एस्केलेटरवर पाऊल ठेवल्याबरोबर हँडरेल (बाजूचा पट्टा) पकडणं कधीही चांगलं. जर एस्केलेटर अचानक थांबलं किंवा झटका बसला, तर तोल जाऊन पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वर किंवा खाली पोहोचेपर्यंत हँडरेल घट्ट पकडून ठेवा.

पिवळ्या रेषेच्या आतच उभे राहा

एस्केलेटरच्या पायऱ्यांच्या बाजूला तुम्ही एक पिवळी रेषा पाहिली असेल. ही सुरक्षेसाठी आखलेली असते. त्या रेषेच्या अगदी कडेला उभं राहणं टाळा. तुमचे बूट किंवा कपडे एस्केलेटरच्या बाजूला अडकण्याचा धोका असतो, त्यामुळे पाय नेहमी पायरीच्या मध्यभागीच ठेवा.

एस्केलेटरवर या गोष्टी अजिबात करू नका

एस्केलेटरवर धावणं, उड्या मारणं किंवा बसणं खूप धोकादायक ठरू शकतं. विशेषतः लहान मुलांना हँडरेलवर खेळण्यापासून किंवा पुढे-मागे धावण्यापासून रोखलं पाहिजे. एस्केलेटरवर शांत उभं राहून हँडरेल पकडणं हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

साडी, ओढणी आणि स्कार्फची काळजी घ्या

सैल कपडे, साडी, ओढणी किंवा लांब कपडे एस्केलेटरच्या कडेला अडकणार नाहीत, याची काळजी घ्या. बुटांची लेस सैल असेल तर ती आधीच व्यवस्थित बांधून घ्या. लहान मुलांसोबत असाल तर त्यांचे कपडे आणि बूटही एकदा तपासून पाहा.

लहान मुलं आणि वृद्धांचा हात घट्ट पकडा

लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती एस्केलेटर वापरत असतील, तेव्हा त्यांचा हात पकडून ठेवणं केव्हाही उत्तम. जर त्यांचा तोल गेलाच, तर त्यांना लगेच सावरण्यासाठी याचा फायदा होतो.

पाय किंवा कपडे अडकले तर काय करावं?

एस्केलेटरमध्ये पाय किंवा कपडे अडकले तर घाबरून पळू नका किंवा विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नका. शक्य असल्यास लगेच एस्केलेटरच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला असलेलं इमर्जन्सी स्टॉप (Emergency Stop) बटण दाबा. यासोबतच तिथल्या व्यवस्थापनाला किंवा सुरक्षा रक्षकांना लगेच माहिती द्या.

लिफ्टचा वापर करा

खूप जड सामान घेऊन एस्केलेटरचा वापर करणं कठीण आणि धोकादायक असू शकतं. अशा वेळी लिफ्टचा वापर करणं जास्त सोयीचं आणि सुरक्षित ठरतं.

मोबाईल वापरणं टाळा

एस्केलेटर चढताना किंवा उतरताना मोबाईलमध्ये गुंग राहणं अपघाताला आमंत्रण देऊ शकतं. विशेषतः उतरताना पायरी संपण्याची जागा लक्षात आली नाही, तर तोल जाण्याची दाट शक्यता असते.u

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hyundai Bayon: फक्त ११ हजार रुपयांत बुक करा ह्युंदाईची नवी मिड-साईझ SUV
Idli Rava Kadubu: तांदूळ भिजवण्याचं टेन्शन विसरा, १५ मिनिटांत बनवा इडली रव्याचे पौष्टिक 'कडुबू'