Hyundai Bayon: फक्त ११ हजार रुपयांत बुक करा ह्युंदाईची नवी मिड-साईझ SUV

vivek panmand   | CMS
Published : Sep 24, 2026, 08:50 PM IST
Hyundai Bayon: फक्त ११ हजार रुपयांत बुक करा ह्युंदाईची नवी मिड-साईझ SUV

सार

ह्युंदाई लवकरच आपली नवीकोरी 'बियॉन' (Bayon) कार लाँच करत आहे. अवघ्या ११ हजार रुपयांत या कारचं बुकिंग सुरू झालंय. भन्नाट डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या कारचे फीचर्स जाणून घ्या.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये ह्युंदाईचा मोठा दबदबा आहे. क्रेटा, व्हेन्यू, i20 आणि i10 सारख्या गाड्यांमुळे ह्युंदाईने ग्राहकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलंय. आता एसयूव्ही गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी एक नवं मॉडेल बाजारात आणत आहे. ह्युंदाईची नवी मिड-साईझ एसयूव्ही 'बियॉन' (Bayon) ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार आहे. पण त्याआधीच कंपनीने या कारचं बुकिंग सुरू केलंय. तुम्ही फक्त ११,००० रुपये टोकन अमाऊंट देऊन ही नवीकोरी कार बुक करू शकता.

आकर्षक लूक आणि भन्नाट फीचर्स

बियॉन ही दिसायला अतिशय स्टायलिश कार आहे. यात ह्युंदाईचा सिग्नेचर डॅशबोर्ड, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि AI तंत्रज्ञानासारखे अनेक भारी फीचर्स मिळतील. नुकतेच या कारचे काही टीझर्स समोर आले आहेत. यात स्पोर्टी स्प्लिट हेडलॅम्प्स, H-आकाराचे एलईडी डीआरएल (DRL), रूफ रेल्स आणि रूफ स्पॉयलरसारख्या गोष्टी लक्ष वेधून घेतात.

कारच्या लोअर बंपरवर हेडलॅम्प्स आणि रफ अँड टफ दिसणारी स्किड प्लेट दिली आहे. तसंच पुल-टाईप डोअर हँडल्स आणि मागच्या बाजूला स्लिम एलईडी लाईट्स या कारचा लूक आणखी वाढवतात. कारची लांबी, रुंदी आणि उंचीबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

स्मूथ इंजिन आणि दमदार परफॉर्मन्स

ह्युंदाईच्या गाड्या त्यांच्या स्मूथ इंजिनसाठी ओळखल्या जातात. या गाड्यांचं गिअर शिफ्टिंग आणि ड्रायव्हिंग खूपच आरामदायी असतं. गाडी चालू असताना आत किंवा बाहेर इंजिनचा अजिबात आवाज येत नाही, ही ह्युंदाईची खासियत आहे. नव्या बियॉनमध्येही असंच एकदम स्मूथ इंजिन पाहायला मिळेल. यात १.५ लिटरचं ४-सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. सोबतच मॅन्युअल आणि सीव्हीटी (CVT) ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध असेल.

नव्या ह्युंदाई बियॉनच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, या कारची एक्स-शोरूम किंमत ९ ते १४ लाख रुपयांच्या घरात असू शकते. ही एक मिड-साईझ एसयूव्ही असल्याने यात भरपूर केबिन स्पेस, बूट स्पेस आणि हेडरूम मिळेल. भारतीय रस्त्यांसाठी ही कार एकदम परफेक्ट ठरू शकते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Idli Rava Kadubu: तांदूळ भिजवण्याचं टेन्शन विसरा, १५ मिनिटांत बनवा इडली रव्याचे पौष्टिक 'कडुबू'
Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?