Creative Leftover Chapati Recipes for a Quick Snack : घरात रात्रीच्या चपात्या उरतात का? काय करावं हे न कळल्यामुळे फेकून देताय? मग हे पदार्थ ट्राय करा. अन्न वाया जाणार नाही आणि न आवडणारेही आवडीने खातील.
अनेक घरांमध्ये रात्री बनवलेल्या चपात्या उरतात. काही जण शिळं खायला बघत नाहीत, तर काहीवेळा त्या कडक होतात. त्यामुळे त्या फेकून दिल्या जातात. पण थोडी क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही याच चपात्यांपासून चविष्ट पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ झटपट तयार होतात आणि मुलांनाही खूप आवडतात. चला तर मग, शिळ्या चपात्यांपासून बनवता येणाऱ्या काही टेस्टी रेसिपी पाहूया.
25
चपाती रोल
चपातीचा रोल बनवून त्यात तुम्ही भाजी किंवा ऑम्लेट भरू शकता. कांदा, कोबी, गाजर आणि टोमॅटोचं छोटंसं स्टफिंग तयार करा आणि चपातीत भरा. मस्त नाश्ता तयार होईल.
35
चपाती पिझ्झा
चपाती पॅनवर ठेवा. त्यावर टोमॅटो सॉस, कांदा, कॅप्सिकम आणि चीज घालून काही मिनिटं गरम करा. झाला तुमचा चपाती पिझ्झा तयार! मुलांना हा प्रकार खूप आवडतो. **चपातीचा उपमा**
हा एक सोपा आणि चविष्ट पदार्थ आहे. उरलेल्या चपात्यांचे लहान तुकडे करून घ्या. पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्या. नंतर त्यात चपातीचे तुकडे, थोडं मीठ, तिखट आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. चपातीचा उपमा तयार!
चपात्यांना लांब कापून नूडल्ससारखं तयार करा. पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात लसूण आणि भाज्या परतून घ्या. नंतर त्यात चपातीच्या पट्ट्या (स्ट्रिप्स) टाकून सोया सॉस किंवा तिखट घालून मिक्स करा. गरमागरम चविष्ट चपाती नूडल्स तयार!
55
चपाती चिप्स
चपात्यांचे लहान तुकडे करा. त्यावर थोडं तेल, मीठ आणि मसाला लावून पॅनमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजा. तुमचे क्रिस्पी चपाती चिप्स तयार! संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी हे उत्तम आहेत. अशाप्रकारे, रात्रीच्या उरलेल्या चपात्या फेकून न देता, थोडी कल्पकता वापरून तुम्ही नवीन पदार्थ बनवू शकता. यामुळे चवीला चव येते आणि अन्न वाया जाण्यापासून वाचतं.