School Uniform Reuse मुलांचे जुने शाळेचे गणवेश फेकून देऊ नका. त्यापासून तुम्ही घरासाठी आणि स्वतःसाठीही काही स्टायलिश वस्तू बनवू शकता. या फोटो गॅलरीत आम्ही तुम्हाला अशाच काही हटके आयडिया देणार आहोत.
अनेक शाळांमध्ये दरवर्षी गणवेश बदलतो. मग जुन्या गणवेशाचं काय करायचं, हा मोठा प्रश्न असतो. मुलं ते पुन्हा घालू शकत नाहीत आणि तो कोणाला देताही येत नाही. अशावेळी DIY क्राफ्टच्या मदतीने तुम्ही जुन्या गणवेशापासून काही खास वस्तू बनवू शकता. चला, अशाच काही आयडिया पाहूया.
25
बहुतेक शाळेचे गणवेश चेक किंवा प्लेन पॅटर्नचे असतात. त्यांचा वापर करून तुम्ही क्रिएटिव्ह कुशन कव्हर बनवू शकता. हे दिसायला तर छान दिसतातच, शिवाय तुमच्या बजेटमध्येही बसतात. त्यावर धाग्यांनी भरतकाम करून तुम्ही त्याला अधिक आकर्षक बनवू शकता.
35
लहान मुलांचे गणवेश कुशन किंवा ड्रेस बनवण्यासाठी खूपच लहान पडतात. अशावेळी तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी (Pet) छान कपडे बनवू शकता. तुम्हाला शिलाई येत असेल तर स्वतः शिवा, नाहीतर टेलरकडून शिवून घ्या. तसेच, जर तुमच्याकडे अनेक प्रकारचे जुने गणवेश असतील, तर त्यापासून तुम्ही बाथरूम किंवा बाल्कनीसाठी पायपुसणी (Doormat) बनवू शकता.
तुमच्या मुलीचा गणवेश जर स्कर्ट असेल, तर त्यापासून तुम्ही एक स्टायलिश ड्रेस बनवू शकता. हा पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि खूप छान दिसतो. स्कर्टची लांबी कमी पडत असेल, तर त्याला अस्तर लावून तुम्ही फुल-हँड शर्टसोबत स्टाईल करू शकता.
55
जुन्या गणवेशाची आठवण जपून ठेवण्यासाठी तुम्ही मुलांसाठी एक गोंडस टेडी बेअर बनवू शकता. हा रिसायकलिंगचा एक उत्तम पर्याय तर आहेच, पण यातून लहानपणीच्या आठवणीही जपल्या जातात.