Countertop Dishwasher: रोज रोज भांडी घासण्याचा कंटाळा आलाय? आता काळजी करू नका. तुमच्यासाठी खास बजेटमध्ये बसणारा एक नवीन डिशवॉशर बाजारात आला आहे. या फोटो गॅलरीमधून आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
आजकाल घर चालवण्यासाठी स्त्री-पुरुष दोघेही नोकरी करतात. ऑफिसमधील कामाचा ताण आणि घरातील कामं, यात महिलांची खूप दमछाक होते. त्यातही स्वयंपाक, कपडे धुणे आणि भांडी घासणे ही कामं काही संपत नाहीत. त्यात जर भांड्यांचा डोंगर साचला असेल, तर ते घासेपर्यंत जीव नकोसा होतो. याच समस्येवर Midea कंपनीचा बजेट डिशवॉशर एक चांगला उपाय ठरू शकतो. यात ताटं, वाट्या, ग्लास आणि चमचे अशी अनेक भांडी एकाच वेळी स्वच्छ करता येतात. लहान आणि मध्यम कुटुंबांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात 6 वेगवेगळे वॉश प्रोग्राम्स आहेत, ज्यामुळे तुम्ही भांड्यांवरील डागांनुसार योग्य मोड निवडू शकता.
23
49% डिस्काउंटसह बजेटमध्ये उपलब्ध
या डिशवॉशरमध्ये 'इंटेन्सिव्ह वॉश' नावाचा एक खास मोड आहे, जो तेलकट, मसालेदार आणि वाळलेले अन्नपदार्थांचे डाग सहज काढतो. भारतीय जेवणातील तेल आणि मसाल्यांचे चिकट डाग काढण्यासाठी हा मोड उत्तम आहे. हाताने भांडी घासण्यापेक्षा हा डिशवॉशर खूप कमी पाणी वापरतो, त्यामुळे पाण्याचीही बचत होते. गरम पाण्याने भांडी धुतल्यामुळे त्यावरील बॅक्टेरिया आणि कीटाणू नष्ट होतात आणि भांडी एकदम स्वच्छ निघतात. सध्या ॲमेझॉनवर हा Midea काउंटरटॉप डिशवॉशर 49% डिस्काउंटनंतर फक्त 14,990 रुपयांना मिळत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही किंमत थोडी जास्त वाटू शकते, पण यामुळे भांडी घासण्याचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात.
33
Midea डिशवॉशरची खास वैशिष्ट्ये
हे एक 'काउंटरटॉप' मॉडेल असल्यामुळे किचनच्या ओट्यावर कमी जागेत सहज बसते. यासाठी तुम्हाला किचनमध्ये मोठे बदल करण्याची गरज नाही. हे मशीन 49 ते 52 डेसिबल (dB) इतकाच कमी आवाज करते, त्यामुळे घरात शांतता राहते. लक्षात ठेवा, यात भांड्याचा साधा साबण वापरता येत नाही. यासाठी डिशवॉशरची खास पावडर/लिक्विड, मीठ आणि 'रिन्स एड' (Rinse Aid) वापरावे लागते. हे मशीन कमी वीज वापरेल अशा पद्धतीने डिझाइन केले आहे. तसेच, भांडी पूर्णपणे सुकवण्यासाठी यात 'ड्राइंग' (Drying) सुविधासुद्धा आहे.