Smoking : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी खूप व्हायरल होत आहे. येत्या काही दिवसांत सिगारेटच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. पण सिगारेटच्या किमती का वाढणार आहेत? यात किती तथ्य आहे? हेच जाणून घेऊया.
१८ रुपयांना मिळणारी सिगारेट अचानक ७२ रुपयांना मिळणार ही बातमी धूम्रपान करणाऱ्यांना धक्का देत आहे. सोशल मीडियावर 'सिगारेटचे दर ४०० टक्क्यांनी वाढत आहेत' असा प्रचार वेगाने पसरत आहे. पण हे पूर्णपणे खरं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. या बातम्या का येत आहेत? यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.
25
तंबाखू उत्पादनांवर नवीन कर योजना -
भारतात सिगारेटवरील कर वाढणे ही नवीन गोष्ट नाही. गेल्या दशकापासून केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने उत्पादन शुल्क आणि सेस वाढवत आहे. नुकत्याच संसदेत मंजूर झालेल्या केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक-२०२५ मुळे पुन्हा एकदा किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकार सध्याची करप्रणाली पूर्णपणे बदलण्याच्या विचारात असल्याचे दिसते.
35
GST 2.0 मुळे काय होणार? -
सध्या सिगारेटवर जीएसटीसोबत विशेष उत्पादन शुल्क लागू आहे. आता सिगारेटला GST 2.0 च्या कक्षेत आणण्याचा कौन्सिलचा विचार आहे. याअंतर्गत ४०% जीएसटीसह मोठे उत्पादन शुल्कही आकारले जाईल. आतापर्यंत एक हजार सिगारेटवर २००० ते ३६०० रुपये असलेले शुल्क, नवीन पद्धतीत २७०० ते ११,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा परिणाम प्रामुख्याने स्वस्त सिगारेटवर होईल.
सोशल मीडियावरील गणितांनुसार, १८ रुपयांच्या सिगारेटवर नवीन उत्पादन शुल्क आणि जीएसटी लावल्यास किंमत चौपट होईल. पण तज्ज्ञांच्या मते, हे प्रत्येक ब्रँडला लागू होणार नाही. प्रीमियम सिगारेटच्या किमती आधीच जास्त असल्याने त्यांच्यावरील वाढ कमी असेल. खरा फटका स्वस्त सिगारेटना बसेल. रोज खरेदी करणारा सामान्य ग्राहकच या बदलामुळे जास्त प्रभावित होईल. सरकारनेही स्वस्त सिगारेटचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने हे धोरण आखले आहे.
55
किंमत वाढल्यास खरंच धूम्रपान सोडतील का?
किंमत वाढल्यास धूम्रपान कमी होईल, असा सरकारचा विचार आहे. पण पूर्वीचे अनुभव पाहता, काहीजण अवैध सिगारेटकडे वळू शकतात. बनावट ब्रँड आणि तस्करीची उत्पादने आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. काहीजण सिगारेटऐवजी बिडीचा पर्याय निवडू शकतात, जी आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, तरुणांमध्ये हे व्यसन लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. या प्रचारात किती तथ्य आहे, हे अधिकृत घोषणेनंतरच कळेल.