Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षांपूर्वी त्यांच्या नीतिशास्त्रात या समस्येवर उपाय सांगितला आहे. त्यांनी तीन खास नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्यास कोणतीही व्यक्ती कधीही आर्थिक संकटात सापडणार नाही.
श्रीमंत असो वा मध्यमवर्गीय, प्रत्येकाला आर्थिक संकट किंवा पैशांची कमतरता जाणवते. लोक पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करतात, पण महिन्याच्या अखेरीस त्यांचा खिसा रिकामा होतो. मग प्रश्न पडतो की, पैसे कुठे गेले आणि आपली चूक कुठे होतेय?
25
आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही
आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षांपूर्वी त्यांच्या नीतिशास्त्रात या समस्येवर उपाय सांगितला आहे. त्यांनी तीन खास नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्यास कोणतीही व्यक्ती कधीही आर्थिक संकटात सापडणार नाही.
35
चाणक्यांचा पहिला नियम
चाणक्य मानतात की, एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न कितीही जास्त असले तरी, खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर तो नेहमी गरीबच राहतो. अनावश्यक खर्च करणारी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, आजच्या काळात महिन्याच्या सुरुवातीला बजेट बनवणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे.
चाणक्य म्हणतात की पैसा फक्त खर्च करण्यासाठी नसतो, तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणेही महत्त्वाचे आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पैसा वाढतो. आजकाल लोक शेअर बाजार, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट आणि सोन्यात गुंतवणूक करताना दिसतात.
55
चाणक्यांचा तिसरा नियम
चाणक्य नीतीनुसार, पैसा नेहमी सुरक्षित ठेवावा. ज्यांना आपल्या संपत्तीचे रक्षण कसे करावे हे माहित नाही, त्यांच्या हातातून पैसा बंद मुठीतून पाण्यासारखा निसटून जातो. त्यामुळे आजच्या काळात बँक बचत, विमा आणि डिजिटल सुरक्षा या स्वरूपात पैसा सुरक्षित ठेवता येतो.