
Chanakya Niti : अनेकदा आपल्याला पदरी अपयश जे येते, ते परिस्थिती किंवा विरोधकांमुळे येत नाही तर, आपल्याच लोकांमुळे येते. याच कथित आपल्या लोकांच्या धूर्त चालींना आपण बळी पडतो. मात्र, प्रत्येकवेळी दोष आपल्या भोवती फिरणाऱ्या या लोकांचा नसतो, तर कधी कधी आपणच त्याला नकळतपणे कारणीभूत ठरतो. काहीवेळेस आपण समोरच्यांच्या बोलण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो. समोरच्या माणसाचा नेमका उद्देश आपल्याला माहीत नसतो आणि त्यामुळे आपण फसतो.
आपल्यावर कोणी नियंत्रण ठेवत असेल तर ते थेट दिसत नाही. तो एक सल्ला वाटतो, काळजी वाटते. 'तुझ्या चांगल्यासाठीच' असं सांगितलं जातं. त्यांचा प्रभाव आपल्या विचारांमध्ये मिसळून जातो. आचार्य चाणक्यांनी शतकांपूर्वीच सांगितले आहे - धोकादायक नियंत्रण शत्रूंकडून नाही, तर आपल्या कमजोरी चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्यांकडून येते. माणूस कमजोर असल्यामुळे शक्ती गमावत नाही, तर दुसऱ्याच्या प्रभावाखाली आल्यावर गमावतो. मग, आपण दुसऱ्याच्या अनावश्यक नियंत्रणाखाली आलो आहोत, हे कधी समजून घ्यायचे? खालील 7 प्रसंगांमधून.
सुरुवातीला ती त्यांची अतिकाळजी वाटते. ते तुमच्या निर्णयांवर वारंवार प्रश्न विचारतात, तुम्ही प्रयत्न करण्यापूर्वीच मधे येतात. सुरुवातीला हे एक समर्थन वाटते, पण हळूहळू तुम्ही मागे हटू लागता. तुम्हाला तुमच्याच निर्णयांवर शंका येऊ लागते. खरी काळजी तुम्हाला मजबूत बनवते, पण काळजीच्या नावाखाली असलेले नियंत्रण तुमचा आत्मविश्वास कमी करते, असे चाणक्य म्हणतात.
२. तुमच्या विरोधाला शांत करणारी प्रशंसा
प्रशंसा ऐकायला छान वाटते, म्हणूनच ती प्रभावी ठरते. तुम्ही सहमत झालात तर तुम्ही 'हुशार' आणि तुम्ही प्रश्न विचारलात तर तुम्ही 'अवघड व्यक्ती' ठरता. हळूहळू खरं बोलण्यापेक्षा शांत राहणंच सोपं वाटू लागतं. चाणक्य म्हणतात, प्रशंसेद्वारे तुमचा अहंकार जिंकला जातो. त्यामुळेच कमजोरी निर्माण होते. प्रशंसेला चिकटून राहिलेले आत्ममूल्य तुमचे स्वातंत्र्य शांतपणे हिरावून घेते.
३. बोलण्याऐवजी अपराधीपणाची भावना आणणे
कारण सांगण्याऐवजी, प्रश्न विचारल्यास तुम्हालाच दोषी ठरवले जाते. 'आम्ही तुझ्यासाठी इतकं केलं' असे संवाद येतात. मुद्दा काय बरोबर आहे यापेक्षा, तुम्ही किती चुकीचे आहात यावर येतो. चाणक्य म्हणतात : जेव्हा अपराधीपणाची भावना येते, तेव्हा विचार करण्याची शक्ती थांबते.
प्रश्न विचारल्यास उत्तर मिळत नाही. 'हीच आपली परंपरा आहे', 'हे असंच व्हायला हवं' असं म्हणून विषय संपवला जातो. तुम्ही प्रश्न विचारला हीच तुमची चूक आहे, असे भासवले जाते. चाणक्य म्हणतात, परंपरेने विचारांना दिशा द्यावी, विचार थांबवू नयेत.
५. तुम्हाला पूर्ण माहिती न देणे
ते थेट खोटं बोलत नाहीत, पण गरजेपुरतीच माहिती देतात. तुम्हाला वाटतं की, निवड तुम्ही केली आहे, पण निवडीची मर्यादा त्यांनीच ठरवलेली असते. चाणक्य म्हणतात, ज्याच्या हातात माहिती असते, त्याच्याच हातात निवड असते.
६. भावनिक बनवून कमजोर बनवणे
तुम्ही प्रश्न विचारल्यास ते दुखावल्याची भूमिका घेतात. रडतात, भावनिक होतात. विषय त्यांच्या चुकीवरून तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर येतो. शेवटी, तुम्हालाच माफी मागण्याची वेळ येते. चाणक्य यांनी सावध केले आहे की, कमजोरपणा कधीकधी एक मोठे शस्त्र असू शकते.
७. त्यांचे विचार तुमचेच वाटू लागतात तेव्हा
ते वारंवार तीच शंका, तीच भीती बोलून दाखवतात. हळूहळू तो तुमचाच विचार वाटू लागतो. तुम्ही न निवडलेल्या विचाराचे तुम्हीच समर्थन करू लागता. चाणक्य यांचे म्हणणे स्पष्ट आहे: मन दबावाने नाही, तर पुनरावृत्तीने जिंकले जाते. ज्या क्षणी दुसऱ्याचा विचार तुमचा वाटू लागतो, त्याच क्षणी नियंत्रण पूर्ण होते.