Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त कष्ट करणे पुरेसे नाही, तर योग्य वेळी आयुष्याचे धडे शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः म्हातारपण येण्यापूर्वी काही गोष्टी शिकल्याच पाहिजेत, असं चाणक्य सांगतात.
आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा अनेकजण बाळगतात आणि त्यासाठी खूप कष्टही घेतात. पण, आचार्य चाणक्य सांगतात की, म्हातारपण येण्याआधी काही महत्त्वाचे धडे शिकणे आवश्यक आहे. कारण म्हातारपणी ज्ञान मिळवून त्याचा फारसा उपयोग होत नाही. चला तर मग, त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
23
म्हातारपण येण्याआधी जाणून घ्या या गोष्टी..
1. वेळेची किंमत: चाणक्य सांगतात की गेलेली वेळ कधीच परत येत नाही. अनेकजण तरुणपणी वेळ वाया घालवतात आणि म्हातारपणी पश्चात्ताप करतात. जो माणूस योग्य वयात योग्य काम करतो, तोच खरा बुद्धिमान असतो.
2. आर्थिक शिस्त: पैसे कसे कमवावेत आणि कसे वाचवावेत, हे तरुण वयातच शिकायला हवं. जो व्यक्ती संपत्ती असताना उधळपट्टी करतो, त्याला नंतर गरिबीत दिवस काढावे लागतात. म्हातारपणी कोणावर अवलंबून राहायचं नसेल, तर तरुणपणीच आर्थिकदृष्ट्या स्थिर होणं गरजेचं आहे.
3. आरोग्य हीच संपत्ती: तरुणपणी आरोग्याकडे दुर्लक्ष करणारे लोक म्हातारपणी कमावलेले सर्व पैसे हॉस्पिटलमध्ये खर्च करतात. म्हणूनच, शरीर साथ देत असतानाच शिस्तबद्ध आहार आणि व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे.
33
4. इतरांच्या चुकांमधून शिका:
4. इतरांच्या चुकांमधून शिकणे: प्रत्येक चूक स्वतः करून शिकण्यासाठी आपलं आयुष्य खूप लहान आहे. हुशार माणूस तोच, जो इतरांच्या अपयशातून धडा घेतो. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करता.
5. धर्म आणि नैतिकता: आयुष्यभर फक्त सुखाच्या मागे धावू नये. धर्माने वागणे, इतरांना मदत करणे यासारख्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. यामुळे म्हातारपणी मनःशांती आणि समाजात आदर मिळतो.