
CBSE Board Exam 2025 Date : सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईकडून 10 वी आणि 12 वी च्या प्रॅक्टिकल परिक्षेची घोषणा करण्यात आली आहे. अशातच विद्यार्थ्यांसाठी परिक्षेचे वेळापत्रक देखील जारी केले आहे. सीबीएसईच्या एका परिपत्रकानुसार बोर्ड परिक्षांची माहिती देण्यात आली आहे. परित्रकात असे म्हटले आहे की, सीबीएसई इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या बोर्ड परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल परीक्षा आणि इंटरन असेसमेंट (IA) येत्या 1 जानेवारीपासून सुरु होणार आहे. याशिवाय लेखी पेपर 15 फेब्रुवारी 2025 पासून असणार आहे.
कुठे पाहाल वेळापत्रक
सीबीएसईच्या बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक जारी करत त्यामध्ये क्रमांकानुसार कोणत्या विषयाचा पेपर असणार आहे हे दिले आहे. वेळापत्रक तपासून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी cbse.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
हिवाळी सत्रातील शाळांमध्ये नोव्हेंबरमध्ये प्रॅक्टिकल
हिवाळी सत्रातील शाळांमध्ये नोव्हेंबरमध्ये प्रॅक्टिकल होणार आहे. प्रॅक्टिल परीक्षा येत्या 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. याआधीच्या परिपत्रकात असे म्हटले होते की, परिक्षेच्या नियमावलीनुसार प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारीपासून होणार आहे. मात्र हिवाळी सत्रातील शाळा जानेवारीत बंद राहण्याची अपेक्षा आहे.
बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक कधी?
बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक कधी जारी होणार याची आता विद्यार्थ्यांकडून वाट पाहिली जात आहे. याधीच्या अंदाजानुसार, लेखी पेपरचे वेळापत्रक डिसेंबर महिन्यात जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वर्ष 2025 मध्ये देश-विदेशातील 8 हजार शाळांमधील 10 वी आणि 12 वी बोर्ड परिक्षेसाठी 44 लाख विद्यार्थी बसणार आहेत.
उपस्थितीबद्दल जारी नोटिस
सीबीएसईने गेल्या काही दिवसांपूर्वी बोर्ड परिक्षेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली होती. यानुसार, विद्यार्थांची कमीत कमी 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. याशिवाय, केवळ आपत्कालीन स्थिती, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजनात सहभागी झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना उपस्थितीत 25 टक्के सूट दिली जाईल. मात्र विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात कागदपत्रे सादर करावी लागतील.