Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाने १५२ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाने प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट muappointment.mu.ac.in वर ऑनलाइन अर्ज पाठवू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १५२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत; ज्यामध्ये विद्याशाखेच्या अधिष्ठाता पद, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. तर या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज कसा करायचा, कुठे पाठवायचा, अर्ज फी याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
रिक्त पदे व पदसंख्या
विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी – ४ जागा.
प्राध्यापक : २१ पदे.
सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल : ५४ पदे
सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल : ७३ पदे
अर्ज कुठे पाठवायचा?
उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे तीन संच रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक २५, फोर्ट, मुंबई-४००३२ येथे पाठवायचे आहेत. उमेदवाराने अर्जाच्या सर्व संचासह त्याचा/तिचा बायोडेटा सबमिट करावा. जाहिरात क्रमांक क्र. एएक्युए/आयसीडी/२०२३-२४/८५३, दिनांक २२ सप्टेंबर २०२३ नुसार सदर पदांकरिता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत, अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज फी
उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादींच्या स्व-प्रमाणित कागदपत्र व अर्ज शुल्कासह अर्ज करायचा आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ५०० रुपये, तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी २५० रुपये अर्ज फी ऑनलाइन भरायची आहे. तसेच उमेदवाराने ही बाब लक्षात ठेवावी की, एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहिती प्रत्येक उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
अधिसूचना
https://muappointment.mu.ac.in/Advt%20%2008.07.2024%20with%20API%20Proforma.pdf
उमेदवार या लिंकद्वारे थेट अर्ज करू शकतात.
लिंक
https://muappointment.mu.ac.in/
आणखी वाचा :
Income Tax Return भरताना या 12 मार्गांनी मिळवलेल्या पैशांवर लागत नाही टॅक्स, पाहा संपूर्ण लिस्ट