मध्य रेल्वेमध्ये 2 हजार 424 जागांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जप्रकिया

Central Railway Apprentice Recruitment 2024 : मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 17, 2024 12:25 PM IST

Central Railway Apprentice Recruitment 2024 : मध्य रेल्वेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत संस्थेतील 2,424 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 16 जुलैपासून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

शैक्षणिक पात्रता

मध्य रेल्वेत शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. एकंदरीतच उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून उत्तीर्ण झालेला असावा आणि त्यांच्याकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे देखील महत्वाचे आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच एससी आणि एसटी उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षे, तर ओबीसी उमेदवारांच्या बाबतीत 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.

कशी होईल उमेदवाराची निवड?

अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान 50 टक्के एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे, त्यामधील आयटीआय गुणांच्या आधारे तयार केली जाईल. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज फी

अर्जाची फी 100 रुपये आहे. तुमची फी ऑनलाइन भरावी. अर्ज भरताना स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग /एसबीआय इत्यादी वापरून पेमेंट केले जाऊ शकते. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिसूचना पाहून घ्यावी. l

लिंक 

https://rrccr.com/rrwc/Files/be2a1bd2-2e6a-4ce1-ba0b-82dd736d7ae9.pdf

आणखी वाचा : 

Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात १५२ पदांवर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे या दिवशी खात्यात पैसे येणार

Income Tax Return भरताना या 12 मार्गांनी मिळवलेल्या पैशांवर लागत नाही टॅक्स, पाहा संपूर्ण लिस्ट

 

 

Share this article