Car Offers: नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? तज्ज्ञांच्या मते, वर्षातले काही महिने कार खरेदीसाठी एकदम बेस्ट असतात. या काळात कंपन्या आणि डीलर्स जबरदस्त डिस्काउंट देतात. चला, जाणून घेऊया हे महिने कोणते आहेत.
स्वतःची कार असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. पण योग्य वेळी गाडी खरेदी केली, तर मोठा डिस्काउंट आणि अनेक फायदे मिळू शकतात. मार्केट एक्सपर्ट्स आणि ऑटो डीलर्सच्या मते, वर्षातले काही महिने कार खरेदीसाठी सर्वोत्तम असतात. या काळात गाडी घेतल्यास तुम्ही नेहमीपेक्षा किमान लाखभर रुपये वाचवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया कोणते आहेत ते महिने.
24
फेब्रुवारी, मार्च
भारतात आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असं असतं. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च हे महिने डीलर्ससाठी खूप महत्त्वाचे असतात. या काळात त्यांना वार्षिक विक्रीचं टार्गेट पूर्ण करायचं असतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी डीलर्स मोठी सूट, कॅश ऑफर्स आणि एक्सचेंज बोनस देतात. ते जुना स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात आणि जुन्या मॉडेलच्या गाड्या कमी किमतीत विकतात. नवीन कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी असते.
34
सप्टेंबर, ऑक्टोबर
आपल्या देशात सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची विक्री वाढते. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये ऑटो कंपन्या खास योजना आणि डिस्काउंट जाहीर करतात. या काळात बँकासुद्धा कमी व्याजदरात कार लोन देतात. कंपन्यांकडून कॅश डिस्काउंट, मोफत ॲक्सेसरीज, इन्शुरन्स ऑफर्स आणि एक्सटेंडेड वॉरंटीसारखे फायदे दिले जातात. अनेकजण दसरा-दिवाळीत नवीन गाडी खरेदी करणं शुभ मानतात.
डिसेंबर महिना गाडी खरेदीसाठी एक उत्तम काळ असतो. नवीन वर्ष जवळ येत असल्यामुळे डीलर्स जुन्या मॉडेलचा स्टॉक संपवण्याचा प्रयत्न करतात. नवीन वर्षाच्या मॉडेल्ससाठी जागा तयार करण्यासाठी ते जुन्या गाड्यांवर प्रचंड डिस्काउंट देतात. डिसेंबरमध्ये घेतलेल्या गाडीचं रजिस्ट्रेशन वर्ष मागचं असतं, पण तरीही अनेकजण कमी किमतीत गाडी खरेदी करतात. विशेषतः बजेटचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.