Car Market : स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी, विशेषतः मालवाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी, टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक पिकअप ट्रक लाँच केला आहे. टाटा इंट्रा ईव्ही (Tata Intra EV) असं या गाडीचं नाव असून, याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
टाटा मोटर्सने लाँच केलेल्या या इलेक्ट्रिक पिकअप ट्रकची सुरुवातीची किंमत सुमारे 11.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. राज्यानुसार ऑन-रोड किंमत थोडी वाढू शकते. ही किंमत 11 लाख ते 13 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. ही गाडी देशभरातील टाटाच्या व्यावसायिक वाहन डीलर्सकडे उपलब्ध आहे.
25
लास्ट-माईल डिलिव्हरी
ही गाडी खास करून लास्ट-माईल डिलिव्हरीसाठी डिझाइन केली आहे. यात एका वेळी जास्तीत जास्त 1,750 किलो वजनाचे सामान वाहून नेता येते. गाडीच्या लोडिंग एरियाची लांबी 10 फुटांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ई-कॉमर्स डिलिव्हरी, दैनंदिन वस्तूंची वाहतूक, कोल्ड स्टोरेज मालवाहतूक आणि कचरा व्यवस्थापनासाठी ही गाडी खूप उपयुक्त आहे. छोटा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
35
एका चार्जिंगमध्ये 211 किलोमीटर
टाटा इंट्रा EV मध्ये 72 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 230 Nm टॉर्क निर्माण करते. गाडीत 28.2 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. या बॅटरीला IP67 रेटिंग मिळालं आहे, म्हणजेच ती धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही गाडी सुमारे 211 किलोमीटरपर्यंत धावते. सामान भरलेले असतानाही, ही गाडी सुमारे 23 टक्के उंचीच्या चढावर सहज चढू शकते.
या इलेक्ट्रिक पिकअप गाडीत CCS2 फास्ट चार्जिंगची सोय आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बॅटरी 10% ते 80% चार्ज होण्यासाठी फक्त 55 मिनिटे लागतात. बॅटरीवर 6 वर्षे किंवा 2 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. यात इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीम, तीन-स्तरीय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, पॉवर असिस्टेड स्टीयरिंग आणि वॉक-थ्रू केबिन डिझाइनसारखे फीचर्स आहेत. टाटाने देशभरात 25,000 हून अधिक चार्जिंग पॉइंट्स आणि 200 हून अधिक EV सर्व्हिस सेंटर्स उभारले आहेत.
55
दरमहा 21 हजारांचा हप्ता!
या गाडीची किंमत अंदाजे 11,00,000 रुपये धरल्यास, बँका साधारणपणे 10% डाउन पेमेंट घेतात. त्यामुळे, तुम्ही 1,10,000 रुपये भरून ही गाडी खरेदी करू शकता. उरलेले 9,90,000 रुपये तुम्हाला कर्ज म्हणून मिळतील. जर तुम्ही 5 वर्षांसाठी 10 टक्के व्याजदराने कर्ज घेतले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 21,000 ते 22,000 रुपयांचा हप्ता (EMI) भरावा लागेल.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .