Toll Plaza New Rules: हायवेने प्रवास करताय? १० एप्रिलपासून टोल नाक्यावर 'हा' बदल; जाणून घ्या नवीन नियम, अन्यथा खिसा होईल रिकामा!

Published : Apr 08, 2026, 07:43 PM IST

Toll Plaza New Rules: १० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद होणारय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या NHAI नवीन नियमांनुसार वैध FASTag नसलेल्या वाहनधारकांना UPI ने पेमेंट केल्यास २५% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल

PREV
15
हायवेने प्रवास करताय? १० एप्रिलपासून टोल नाक्यावर 'हा' बदल

Toll Plaza New Rules: जर तुम्ही येत्या काळात हायवेवरून प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या ४८ तासांत देशभरातील टोल प्लाझावर मोठे बदल होणार असून, एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. 

25
10 एप्रिलपासून 'हे' काम बंद!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) घेतलेल्या निर्णयानुसार, 10 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर रोख रक्कम (Cash) स्वीकारली जाणार नाही. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. आता सर्व व्यवहार पूर्णपणे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच होतील. 

35
FASTag नसेल तर किती दंड लागेल?

अनेकांना वाटते की FASTag नसेल तर आपण UPI ने पैसे देऊ शकतो, पण इथेच खरी गोम आहे. नव्या नियमांनुसार

ज्यांच्याकडे वैध FASTag नाही, त्यांना UPI ने पेमेंट करण्याची सुविधा मिळेल.

पण, अशा वाहनधारकांना सामान्य टोल दरापेक्षा 1.25 पट (25% जादा) शुल्क मोजावे लागेल.

म्हणजेच, जर तुमचा टोल 100 रुपये असेल, तर तुम्हाला 125 रुपये द्यावे लागतील.

महत्त्वाची टीप: हा नियम अशा लोकांसाठी आहे जे नियमांचे पालन करत नाहीत किंवा शेवटच्या क्षणी पेमेंट करतात. लांबच्या प्रवासात हा 25% जादा भार तुमच्या खिशावर मोठा ताण देऊ शकतो. 

45
सरकारने हा कठोर निर्णय का घेतला?

ट्रॅफिकमधून सुटका: रोख व्यवहारामुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. डिजिटल पेमेंटमुळे हा वेळ वाचणार आहे.

इंधनाची बचत: गाड्यांना थांबावे न लागल्यामुळे इंधनाचा वापर कमी होईल आणि पर्यावरणाचे प्रदूषणही घटेल.

पारदर्शकता: सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्यामुळे व्यवस्थेत पारदर्शकता येईल. 

55
वाहनधारकांनो, हे कराच!

तुमचा प्रवास विनासायास आणि स्वस्त व्हायचा असेल, तर आजच तुमच्या वाहनाचा FASTag चेक करा. तो सक्रिय (Active) असल्याची खात्री करा आणि त्यात पुरेसा बॅलेन्स ठेवा. जर तुमच्याकडे FASTag नसेल, तर 10 एप्रिलपूर्वी तो लावून घ्या, अन्यथा प्रत्येक टोलवर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories