Car Market: टाटा मोटर्सने आपली नवीन Curvv EV Series X कार लॉन्च केली आहे. 55 kWh बॅटरी पॅकसह येणारी ही कार जवळपास 400 किमीची रेंज देते. यात पॅनोरॅमिक सनरूफ आणि ADAS सारखे आधुनिक फीचर्सही आहेत.
टाटा मोटर्सने Curvv EV Series X मॉडेल सादर करून भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. 16.99 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीमुळे, ही कार मिड-रेंज EV खरेदीदारांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहे. याचे नवीन फीचर्स आणि वाढलेली रेंज या मॉडेलकडे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
25
400 किमीचा प्रवास, 502 किमी रेंज
टाटा Curvv EV Series X दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: Accomplished X 55 आणि Empowered X 55. या दोन्ही मॉडेल्समध्ये 55 kWh क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. ARAI च्या अंदाजानुसार ही कार 502 किमी रेंज देईल, पण प्रत्यक्षात जवळपास 400 किमीचा प्रवास करू शकेल, असं कंपनीने स्पष्ट केलंय. रोजच्या प्रवासासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी ही रेंज पुरेशी आहे.
35
बॅटरीवर 15 वर्षांची वॉरंटी
ही इलेक्ट्रिक SUV टाटाच्या acti.EV प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कार 167 bhp पॉवर आणि 215 Nm टॉर्क निर्माण करते. यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव एकदम स्मूथ आणि दमदार मिळतो. विशेष म्हणजे, पहिल्या मालकाला हाय-व्होल्टेज बॅटरीवर 15 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे, हे या मॉडेलचं मुख्य आकर्षण आहे.
Accomplished X 55 व्हेरिएंटमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, दोन 10.25-इंच डिजिटल स्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्स मिळतात. तर Empowered X 55 व्हेरिएंटमध्ये 9-स्पीकर JBL साउंड सिस्टीम, लेव्हल 2 ADAS सुरक्षा, 18-इंच अलॉय व्हील्स, V2L आणि V2V टेक्नॉलॉजी, आणि जेस्चर टेलगेट यांसारख्या प्रगत सुविधा आहेत. यासोबतच डार्क एडिशन डिझाइनचा पर्यायही उपलब्ध आहे.
55
किंमत
या मॉडेलसाठी 'Nitro Crimson' नावाचा नवीन रंगही सादर करण्यात आला आहे. किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, Accomplished X 55 ची किंमत 16.99 लाख रुपये, Empowered X 55 ची किंमत 19.19 लाख रुपये आणि डार्क एडिशनची किंमत 19.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किमती आणि फीचर्समुळे टाटा Curvv EV Series X भारतीय EV बाजारात एक मोठी स्पर्धक म्हणून समोर येत आहे.