नवीन कार विकत घ्यायची असेल तर आधीच बुकिंग करावे लागते. पण आता जीएसटीचा नवा दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने असे बुकिंग केले तर त्याचा फायदा या ग्राहकांना मिळेल का ते जाणून घ्या. डिलर्स काय म्हणतात.
केंद्र सरकारने कार खरेदीदारांसाठी मोठी सवलत जाहीर केली आहे. जीएसटी २.० अंतर्गत वाहनांवरील कर कमी करण्यात आला आहे. हा नवा दर २२ सप्टेंबरपासून लागू होईल. यामुळे कार खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
25
२२ सप्टेंबर नवा जीएसटी
कार खरेदी करणे हे घर बांधण्यासारखेच दीर्घ नियोजनाचे काम असते. अनेक महिन्यांपूर्वी गाड्या बुक करून, सणासुदीच्या काळात डिलिव्हरी मिळण्याची वाट बघावी लागते. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, “नवीन जीएसटी दराचा फायदा आपल्याला मिळेल का?”
35
कार बुकिंग जीएसटी फायदा
डीलर्सचे उत्तर स्पष्ट आहे. डिलिव्हरीची तारीख महत्त्वाची आहे. २२ तारखेला किंवा त्यानंतर कार डिलिव्हरी घेणाऱ्यांना नवीन जीएसटी दराचा फायदा मिळेल. कारण कर बुकिंगच्या तारखेला नाही तर बिल तयार होण्याच्या तारखेला आकारला जातो. २२ तारखेपूर्वी कार घेतल्यास जुनाच कर लागू होईल. त्यामुळे अनेक जण डिलिव्हरी पुढे ढकलत आहेत.
१२००cc पर्यंतच्या इंजिन असलेल्या, ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या पेट्रोल किंवा CNG कारवर पूर्वी २९% कर होता. आता तो १८% आहे. त्यामुळे Maruti Alto K10, Swift, Hyundai i20, Tata Tiago, Renault Kwid यांसारख्या कार स्वस्त होतील. १५००cc पर्यंतच्या डिझेल कारवरही १८% जीएसटी लागू होईल.
55
सणासुदीच्या काळात कार सवलत
मोठ्या कारवरील कर जरी जास्त असला तरी तो पूर्वीपेक्षा कमी आहे. Maruti Brezza, XL6, Hyundai Creta, Honda City यांसारख्या मोठ्या पेट्रोल कारवर ४०% कर असेल. पूर्वी तो ४५% होता. Tata Harrier, Safari, Mahindra Scorpio-N, XUV700 यांसारख्या मोठ्या डिझेल कारवर ४८% ऐवजी आता ४०% जीएसटी लागू होईल.