तुमच्या जुन्या घराला कमी बजेटमध्ये लक्झरी लुक देणं आता खूप सोपं झालं आहे. योग्य पेंट, स्मार्ट लायटिंग, डेकोरेशनच्या वस्तू आणि पडद्यांमध्ये बदल करून तुम्ही घराला मॉडर्न आणि प्रीमियम बनवू शकता.
Home Makeover आपल्याला आपलं घर स्टायलिश, मॉडर्न आणि लक्झरी दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण प्रत्येक वेळी नवीन घर घेणं शक्य नसतं. चांगली गोष्ट म्हणजे, थोडी कल्पकता वापरून तुम्ही तुमच्या जुन्या घरालाही एक सुंदर आणि प्रीमियम लुक देऊ शकता. यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त योग्य ठिकाणी छोटे बदल करायचे आहेत. चला, तुमच्या घराचा लुक पूर्णपणे बदलून टाकणारे ५ सोपे मार्ग जाणून घेऊया.
26
मॉडर्न आणि लक्झरी घर
घराच्या भिंती संपूर्ण इंटेरिअरचा मूड ठरवतात. जुन्या आणि फिकट रंगांऐवजी ऑफ-व्हाईट, बेज किंवा पेस्टल शेड्ससारखे हलके न्यूट्रल टोन निवडा. तुम्हाला थोडी अधिक स्टाईल हवी असेल, तर एका भिंतीवर वॉल टेक्सचर किंवा वॉलपेपर लावून तुम्ही 'फोकस एरिया' तयार करू शकता. यामुळे घर लगेच मॉडर्न आणि लक्झरी दिसू लागतं.
36
घराला हॉटेलसारखा फील
योग्य लायटिंग कोणत्याही सामान्य घराला आलिशान बनवू शकते. यासाठी 'वॉर्म लाईट' म्हणजेच पिवळसर लाईटचा वापर करा. सीलिंग लाईटसोबतच जमिनीवर किंवा भिंतीवर LED स्ट्रिप लाईट लावा. छोटे दिवे आणि पेंडंट लाईट्स (pendant lights) घराला हॉटेलसारखा फील देतात.
संपूर्ण फर्निचर बदलण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही जुन्या सोफ्याला किंवा टेबलला नवीन कव्हर, पेंट किंवा कुशन लावून नवा लुक देऊ शकता. घरात मोकळी जागा दिसावी आणि ते स्टायलिश वाटावं यासाठी मल्टीफंक्शनल आणि मिनिमल फर्निचर निवडा. लाकूड आणि मेटलचं कॉम्बिनेशन लक्झरी फील आणखी वाढवतं.
56
घराचं सौंदर्य
घराचं सौंदर्य छोट्या डेकोरेशनच्या वस्तूंनीही वाढवता येतं. यासाठी वॉल पेंटिंग, आरसे, इनडोअर प्लांट्स आणि शोपीसचा योग्य वापर करा. विशेषतः मोठे आरसे लावल्यास खोली मोठी आणि प्रीमियम दिसते. हिरवीगार रोपं घरात ताजेपणा आणि लक्झरी टच देतात.
66
फ्लोई आणि न्यूट्रल रंगाचे पडदे लावा
तुमचं बजेट कमी असेल तर संपूर्ण फ्लोअरिंग बदलण्याची गरज नाही. चांगल्या क्वालिटीच्या कार्पेट किंवा मॅटने तुम्ही फ्लोअरला नवा लुक देऊ शकता. यासोबतच, जड आणि जुन्या पडद्यांऐवजी हलके, फ्लोई आणि न्यूट्रल रंगाचे पडदे लावा. यामुळे घर अधिक मोकळं, स्वच्छ आणि लक्झरी दिसतं.