Madhubani Sarees बिहारच्या हस्तकलेबद्दल बोलायचं झालं, तर मधुबनी पेंटिंगचं नाव सर्वात आधी येतं. हीच सुंदर कला जेव्हा साडीवर उतरते, तेव्हा तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. आम्ही तुम्हाला ओरिजिनल मधुबनी प्रिंट साडीच्या काही खास डिझाइन्स दाखवत आहोत.
प्रत्येक आत्यासाठी भाचीचं लग्न हा एक खास क्षण असतो. यावेळी आपल्या प्रेमाची आणि आपुलकीची भावना एका खास गिफ्टमधून व्यक्त करण्याची तिची इच्छा असते. तुम्ही जर काहीतरी युनिक आणि पारंपरिक भेट देण्याचा विचार करत असाल, तर मधुबनी साडी हा एक उत्तम पर्याय आहे. या साडीवरील सुंदर हँडपेंटेड डिझाइन्स आणि पारंपरिक लुक केवळ तुमची निवडच खास बनवणार नाही, तर माहेरी तुमचा मान-सन्मानही वाढवेल. ही साडी फक्त एक गिफ्ट नाही, तर भावना आणि परंपरेचा सुंदर मिलाफ आहे.
26
मधुबनी प्रिंट साडी
ऑरेंज रंगाची मधुबनी प्रिंट साडी लग्न-समारंभात नेसण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. अशा प्रकारची साडी तुम्ही तुमच्या भाचीला तिच्या पाठवणीच्या वेळी (विदाई) देऊ शकता. या साडीच्या पदर आणि बॉर्डरवर अतिशय नाजूक प्रिंट असतो.
36
एलिगंट लूक
निळ्या रंगातील ही मधुबनी प्रिंट साडी खूपच सुंदर दिसते. ही सिल्क साडी तुम्ही कोणत्याही खास कार्यक्रमात नेसून एलिगंट लूक मिळवू शकता. साडीच्या पदरावर आणि बॉर्डरवर मॉडर्न टचसह हँड प्रिंट केलेला असतो.
गुलाबी रंगाची मधुबनी प्रिंट साडी तरुण मुलींवर खूपच गॉर्जिअस दिसते. या साडीच्या पदरावर आणि बॉर्डरच्या थोडं वरच्या बाजूला प्रिंट दिलेला असतो. मॉडर्न लूकसाठी तुम्ही या प्रिंटच्या साडीसोबत प्लेन ब्रॅलेट कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालू शकता.
56
पारंपरिक लूक
मधुबनी प्रिंटची क्रीम रंगाची साडी तुम्हाला एस्थेटिक आणि पारंपरिक लूक देते. साडीवर हाताने नाजूक मधुबनी प्रिंट केलेलं असतं. जर तुम्ही प्युअर सिल्क मधुबनी प्रिंट साडी खरेदी करणार असाल, तर बजेट थोडं जास्त ठेवावं लागेल. या साड्या तुम्हाला ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत मिळतील.
66
गोल्ड ज्वेलरी स्टाईल
मधुबनी प्रिंटमध्ये पोपटी (Parrot Green) रंगाची साडीसुद्धा खूप सुंदर दिसते. अशा प्रकारची साडी तुम्ही श्रावणातील सणांसोबतच कोणत्याही खास कार्यक्रमात नेसू शकता. या साडीसोबत तुम्ही गोल्ड ज्वेलरी स्टाईल करून रॉयल लूक मिळवू शकता.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .