Brown Eggs vs White Eggs : ब्राऊन कोंबडीची अंडी आणि पांढऱ्या कोंबडीची अंडी यांच्या पोषणात काही फरक आहे का? दोन्ही लहान मुलांनी द्यावी का? याबद्दल या लेखात जाणून घेऊया.
अंडी हे पोषक तत्वांचा खजिना आहे. एका मोठ्या अंड्यात सुमारे 6 ते 7 ग्रॅम प्रथिने असतात. हे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी मदत करते. यात 9 आवश्यक अमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे ए, डी, ई, बी12 असतात.
25
वजन कमी करण्यासाठी अंडी खाण्याचे मार्ग
पिवळा बलक मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पांढरा भाग चरबीमुक्त प्रथिने देतो. पण तपकिरी देशी अंडी आणि पांढरी ब्रॉयलर अंडी, यात जास्त पौष्टिक काय? यात खरंच फरक आहे का?
35
अंड्याच्या रंगाचा आणि पोषणाचा संबंध
अंड्याच्या कवचाचा रंग कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो. याचा अर्थ त्यात जास्त पोषक तत्वे आहेत असा होत नाही. दोन्ही रंगांच्या अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे सारखीच असतात.
अंड्याच्या कवचाचा रंग कोंबडीच्या जातीनुसार ठरतो, पोषणावर नाही. कोंबडीचे वय, तिचे खाद्य आणि संगोपन पद्धतीमुळे पोषणात थोडा फरक येऊ शकतो. पण दोन्ही अंड्यांमधील पोषक तत्वे जवळपास सारखीच असतात.
55
लहान मुलांना द्यावी का..
दोन्ही प्रकारची अंडी लहान मुलांसाठी पोषक आहेत. त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. त्यांना ब्राऊन आणि पांढरी अशी दोन्ही अंडी देता येतात. अंडी खाणारा मुलगा किंवा मुलगी कमी आजारी पडते असेही म्हटले जाते.