सर्वात आधी नारळाच्या सुक्या शेंड्यांचे लहान-लहान तुकडे करा. त्यानंतर हे तुकडे २४ तास पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे त्यातील फायबर मऊ होईल. दुसऱ्या दिवशी हे तुकडे मिक्सरमध्ये थोडे भरडसर वाटा किंवा हातानेच कुटून घ्या. आता हे मिश्रण एका डब्यात किंवा बादलीत भरून ४-५ दिवस झाकून ठेवा. या काळात हे मिश्रण थोडे आंबून (ferment) झाडांसाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण असं खत तयार होतं. हे तयार खत मातीत मिसळून वापरा.
24
नारळाच्या शेंडीमधील फायबर मातीतील ओलावा जास्त काळ टिकवून ठेवतं. उन्हाळ्यात जेव्हा झाडांची माती लवकर सुकते, तेव्हा हे खत पाणी शोषून घेतं आणि हळूहळू झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवतं. यामुळे झाडांना वारंवार पाणी देण्याची गरजही कमी होते. सोबतच, यात असलेलं पोटॅशियम आणि मिनरल्स झाडांच्या वाढीसाठी आणि नवीन पालवी फुटण्यासाठी मदत करतात.
34
नारळाच्या शेंडीचं खत (Coconut Husk Fertilizer) विशेषतः मनी प्लांट, स्नेक प्लांट, कोरफड (एलोवेरा), गुलाब, टोमॅटो, मिरची आणि इतर बागेतील झाडांसाठी खूप उपयुक्त आहे. कुंडीतील झाडांमध्ये हे खत मिसळल्याने माती हलकी आणि हवा खेळती राहते, ज्यामुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि झाडं वेगाने वाढतात.
नारळाचं खत वापरताना ते थेट मुळांवर टाकू नका, तर मातीत व्यवस्थित मिसळा. महिन्यातून एकदा याचा वापर करणं पुरेसं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात खत टाकलं, तर मातीत ओलावा गरजेपेक्षा जास्त होऊ शकतो, म्हणून संतुलित प्रमाणातच वापर करा. योग्य प्रकारे वापर केल्यास हे घरगुती खत तुमच्या झाडांना उन्हाळ्यातही हिरवंगार ठेवू शकतं.