LPG सिलेंडर हवाय? मग 'हे' काम आधी करा! केंद्र सरकारचा नवा नियम; आता घरबसल्या होणार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन

Published : Mar 16, 2026, 09:47 PM IST

LPG e-KYC Update: केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांसाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (e-KYC) अनिवार्य केले, जे आता मोबाईल ॲपद्वारे घरी बसूनही पूर्ण करता येते. गॅस तुटवडा हा भीतीपोटी होणाऱ्या अतिरिक्त बुकिंगमुळे असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

PREV
15
सिलेंडर हवाय? मग 'हे' काम आधी करा! केंद्र सरकारचा नवा नियम

LPG e-KYC Update: गॅस एजन्सीबाहेरच्या लांबच लांब रांगा आणि "गॅसचा पुरवठा बंद होणार का?" या चर्चांनी सध्या सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही! केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांसाठी 'बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन' (e-KYC) अनिवार्य केले असून, हे काम आता तुम्ही अगदी घरी बसूनही पूर्ण करू शकता. नेमका नियम काय आहे आणि सध्या गॅसचा तुटवडा का भासतोय? जाणून घ्या सविस्तर…

25
तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही!

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्हाला केवायसी (e-KYC) करण्यासाठी गॅस एजन्सीवर जाण्याची सक्ती नाही. तुम्ही खालील पद्धतीने घरी बसून हे काम करू शकता.

१. मोबाईल ॲपचा वापर: तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप (उदा. Indane, HP Pay, किंवा Hello BPCL) आणि 'Aadhaar FaceRD' हे ॲप डाऊनलोड करा.

२. चेहरा ओळखून व्हेरिफिकेशन: या ॲप्सच्या मदतीने तुम्ही फेस स्कॅन करून तुमचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करू शकता.

३. ऑफलाईन पर्याय: ज्यांना ॲप वापरणे जमत नाही, ते आपल्या जवळच्या गॅस वितरकाकडे (Distributor) जाऊन बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

महत्त्वाची टीप: गॅस कनेक्शन वैध ठेवण्यासाठी आणि सबसिडीचा लाभ घेण्यासाठी हे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.

35
गॅस तुटवड्याची ओरड का? जाणून घ्या 'होर्मुज' कनेक्शन

सध्या गॅसचा तुटवडा जाणवण्यामागे जागतिक कारणे आहेत. भारताची ९०% एलपीजी आयात 'स्ट्रोट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) या सागरी मार्गावरून होते. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मार्ग विस्कळीत झाला आहे.

परंतु, तज्ज्ञांच्या मते, सध्या भासणारा तुटवडा हा 'वास्तव' नसून 'आभास' आहे. भीतीपोटी नागरिक जास्तीचे सिलेंडर बुक करत असल्यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. 

45
हॉटेल व्यवसायाला युद्धाची झळ

घरगुती ग्राहकांपेक्षा व्यावसायिक (Commercial) क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. १९ किलोच्या निळ्या सिलेंडरचा पुरवठा अनियमित झाल्याने अनेक छोट्या खानावळी आणि रेस्टॉरंट्स संकटात आहेत. परिणामी, अनेक विक्रेते आता गॅसऐवजी 'इंडक्शन' किंवा इतर विजेवर चालणाऱ्या उपकरणांकडे वळत आहेत. 

55
अफवांवर विश्वास ठेवू नका

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपले e-KYC वेळेत पूर्ण करा आणि गॅसचा वापर काटकसरीने करा.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories