Bike Market: पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. रोज ऑफिसला जाणाऱ्यांपासून ते झोमॅटो, रॅपिडोसारख्या डिलिव्हरी सेवा देणाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा फटका बसतोय. यावर उपाय म्हणजे जबरदस्त मायलेज देणाऱ्या 100cc बाईक्स.
100cc बाईक्स मायलेजच्या बाबतीत सगळ्यात पुढे असतात. यांचं इंजिन लहान असलं तरी रोजच्या वापरासाठी पुरेशी ताकद देतात. या बाईक्स एक लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 65 ते 80 किलोमीटर धावतात. त्यामुळे रोज नोकरी, कॉलेज किंवा छोट्या कामांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी त्या खूप फायदेशीर ठरतात. शिवाय, यांचा मेन्टेनन्स खर्चही कमी असतो.
26
TVS Radeon बाईक
TVS Radeon बाईक तिच्या मजबूत बांधणी आणि मेटल पार्टसमुळे ओळखली जाते. तिची डिझाइन साधी असली तरी परफॉर्मन्स दमदार आहे. दिल्लीत या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 55,400 रुपये आहे, तर RTO आणि इन्शुरन्स मिळून ऑन-रोड किंमत 64,323 रुपयांपर्यंत जाते. कमी रनिंग कॉस्टमुळे अनेकजण रोजच्या प्रवासासाठी ही बाईक निवडतात.
36
Hero Splendor Plus
Hero Splendor Plus ही भारतातील सर्वात विश्वासार्ह बाईक्सपैकी एक आहे. ही बाईक एका लिटरमध्ये सुमारे 70 किलोमीटरचं मायलेज देते. तिची एक्स-शोरूम किंमत 76,177 रुपये आहे, तर ऑन-रोड किंमत जवळपास 90,873 रुपये होते. साधी डिझाइन, चांगली कामगिरी आणि कमीत कमी समस्यांमुळे अनेकजण या बाईकला पहिली पसंती देतात.
Hero HF Deluxe कमी किमतीत चांगलं मायलेज देणारी बाईक म्हणून ओळखली जाते. दिल्लीत तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे 58,877 रुपये आहे, तर ऑन-रोड किंमत 69,825 रुपयांपर्यंत जाते. ही बाईकसुद्धा एका लिटरमध्ये जवळपास 70 किलोमीटर मायलेज देते. रोजच्या वापरासाठी हा एक सोपा आणि विश्वासार्ह पर्याय आहे.
56
Bajaj Platina
Bajaj Platina ही बाईक आराम आणि मायलेज या दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. ही बाईक खरंतर रस्त्यावर चालवताना एका लिटरमध्ये सुमारे 72 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. तिची ऑन-रोड किंमत जवळपास 85,000 रुपयांपर्यंत आहे. सॉफ्ट सस्पेन्शनमुळे लांबच्या प्रवासातही थकवा कमी जाणवतो.
66
100cc बाईक्सचे इंजिन
100cc बाईक्सचे इंजिन साधे आणि मजबूत डिझाइन केलेले असते. त्यामुळे यात सहसा बिघाड होत नाही. काही छोटी समस्या आलीच, तर ती दुरुस्त करणं सोपं असतं. या बाईक्सचे स्पेअर पार्ट्स स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. म्हणूनच कमी खर्चात या बाईक्स जास्त काळ चालवता येतात.