तरुणी-महिलांसाठी बेस्ट लाईटवेट 3 स्कूटर, लायसन्सची गरज नाही, किंमतही केवळ 55 हजार

Published : Dec 09, 2025, 09:00 AM IST

Best Lightweight Electric Scooters : महिलांसाठी वापरायला सोप्या आणि हलक्या वजनाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वाढत आहे. कमी वजन, स्टायलिश डिझाइन आणि बजेटमध्ये बसणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया.

PREV
14
महिलांसाठी स्कूटर्स

इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठ वेगाने वाढत असून, महिलांसाठी सोयीस्कर असलेल्या हलक्या वजनाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना मोठी मागणी आहे. कमी वजन, स्टायलिश लूक, शहरात फिरण्यासाठी पुरेशी पॉवर आणि बजेटमध्ये उपलब्ध असल्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात या स्कूटर्सची निवड करत आहेत.

24
कमी किंमत

या यादीत सर्वात आधी नाव येते Zelio Little Gracie स्कूटरचे. फक्त 80 किलो वजनाचे हे मॉडेल महिला गर्दीतही आत्मविश्वासाने चालवू शकतात. एका चार्जमध्ये 60 ते 90 किमी धावते. सेंटर लॉक, USB चार्जिंग आणि लायसन्सची गरज नसल्याने महिलांसाठी वापरण्यास सोपी आहे. याची किंमत सुमारे 55,000 ते 60,000 रुपये आहे.

34
हलक्या वजनाची स्कूटर

या यादीतील पुढचे नाव आहे Okinawa Lite. हे मॉडेल शहरात फिरण्यासाठी उत्तम आहे. 1.25 kWh बॅटरीसह 60 किलोमीटरची रेंज देते. 25 किमीचा कमाल वेग आणि 740 मिमी सीटची उंची यामुळे महिलांना ती हाताळायला सोपी जाते. याची एक्स-शोरूम किंमत 69,093 रुपये आहे. तर, जास्त रेंज हवी असणाऱ्यांसाठी Ampere Magnus EX एक चांगला पर्याय आहे.

44
महिलांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर्स

ही इलेक्ट्रिक स्कूटर 121 किमीची ARAI रेंज, 82 किलो वजन आणि 'लिम्प होम' सारख्या वैशिष्ट्यांमुळे खास ठरते. याची किंमत 67,999 ते 94,900 रुपयांपर्यंत आहे. कमी वजन, बजेटमध्ये आणि रोजच्या प्रवासासाठी सोयीस्कर असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटर्स महिलांसाठी उत्तम पर्याय आहेत.

Read more Photos on

Recommended Stories