रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे
तुळशीमध्ये असलेले युजेनॉल, लिनालूल, सिट्रल सारखे नैसर्गिक तेल शरीरातील फ्री रॅडिकल्सना रोखतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
विषारी पदार्थ काढून टाकणे (डिटॉक्स इफेक्ट)
तुळशीचे पाणी यकृताला स्वच्छ करण्यास मदत करते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून ताजेपणा देते.
रक्तदाब, मधुमेह नियंत्रण
तुळशीमध्ये ग्लुकोज चयापचय नियंत्रित करणारे गुणधर्म आहेत. तुळशीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. तसेच, ते उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.