
Balcony Garden: होम गार्डन म्हणजे गॅलरी, खिडकी किंवा गच्चीवर कुंडीत झाडे लावणे. ताजी भाजी, फुले आणि औषधी वनस्पतींसाठी हे उत्तम आहे. चांगली माती, पुरेसा सूर्यप्रकाश, नियमित पाणी आणि सेंद्रिय खत वापरून तुम्ही छोटी जागाही नंदनवन बनवू शकता, ज्यामुळे घरात प्रसन्नता व आरोग्य टिकून राहते. कुंड्यांप्रमाणेच हॅंगिंग कुंड्यांमध्येही झाडे लावता येतात. या प्रकारच्या कुंड्या हुकवर अडकवून घरात हिरवळ तयार करता येते.
आपलं घर सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं, पण कधीकधी बजेटमुळे ते शक्य होत नाही. जर तुम्हालाही तुमची बाल्कनी किंवा खिडकी सजवायची असेल, तर हँगिंग पॉटमधली झाडं हा एक उत्तम पर्याय आहे. ही झाडं कमी जागेत जास्त हिरवळ देतात आणि घराला एक फ्रेश लूकही देतात. चला तर मग, अशा ४ हँगिंग प्लांट्सबद्दल जाणून घेऊया, ज्यांची जास्त काळजी न घेताही तुम्ही तुमच्या बागेत सहज वाढवू शकता.
डंकी टेलला 'Burro's Tail' असंही म्हणतात. हे एक खूप सुंदर दिसणारं सेक्युलेंट प्रकारातलं रोपटं आहे. त्याच्या खाली लटकणाऱ्या लांब फांद्या खूप आकर्षक दिसतात. हे रोपटं लावणं खूप सोपं आहे, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
ज्या लोकांना झाडांची काळजी घ्यायला जास्त वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी बेबी सनरोज प्लांट उत्तम आहे. हे रोपटं त्याच्या लहान, रंगीबेरंगी फुलांसाठी ओळखलं जातं. या रोपट्याला हलकं ऊन आणि कमी पाणी लागतं.
जर तुम्हाला हिरव्या पानांव्यतिरिक्त काहीतरी वेगळं हवं असेल, तर तुम्ही जांभळ्या रंगाचं वॉन्डरिंग ज्यू हे हँगिंग प्लांट निवडू शकता. याला हलकं ऊन आणि रोज पाण्याची गरज असते. विशेष म्हणजे, हे रोपटं मातीत आणि पाण्यात, दोन्ही ठिकाणी सहज वाढतं.
या हँगिंग प्लांटची पानं कासवाच्या पाठीच्या आकाराची, छोटी-छोटी असतात. याला जास्त देखभालीची गरज नसते. तुम्ही याला हँगिंग बास्केटमध्ये किंवा कुंडीत लावू शकता.