भारतात ई-रिक्षाचा वापर वेगाने वाढत असताना, बजाज कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक रिक्षा 'रिक्की' सादर केली आहे. तीनचाकी वाहनांमध्ये अनेक वर्षांपासून विश्वास निर्माण करणाऱ्या बजाजने आता या अनुभवाच्या जोरावर ई-रिक्षा क्षेत्रात मोठे बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.
चालकांचे उत्पन्न वाढवणे, प्रवाशांना सुरक्षित सेवा देणे आणि बाजारातील कमी दर्जाच्या मॉडेल्सपेक्षा जास्त काळ टिकणारी रिक्षा उपलब्ध करणे हे रिक्कीचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोविड-१९ नंतर ई-रिक्षा बाजारपेठेचा विस्तार झाला असला तरी, अनेक मॉडेल्समध्ये आजही मोठ्या त्रुटी आढळतात.
हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा.