Mahindra Bolero 7 Seater SUV Offers Upto 1 35 Lakh Discount : यावर्षी महिंद्रा बोलेरोच्या 82,915 युनिट्सची विक्री झाली आहे. सध्या बोलेरो क्लासिक आणि नियो मॉडेल्सवर 1.35 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत. जाणून घ्या..
महिंद्राच्या विक्रीत नेहमीच आघाडीवर असलेल्या मॉडेल्सपैकी एक म्हणजे बोलेरो. स्कॉर्पिओनंतर ही सर्वाधिक विकली जाणारी गाडी आहे. या वर्षात आतापर्यंत बोलेरोच्या 82,915 युनिट्सची नोंद झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बोलेरोची विक्री 1 लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः, वर्षाच्या अखेरीस डीलर्सकडून मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफर्समुळे या मॉडेलकडे ग्राहकांचे लक्ष वाढण्याची शक्यता आहे.
24
महिंद्रा बोलेरो
यावर्षी बोलेरो क्लासिक आणि बोलेरो नियो या दोन्ही मॉडेल्सची मिळून 82,915 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 86,805 युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे विक्रीत सुमारे 4.7% घट झाली आहे. सध्या बोलेरो खरेदी करणाऱ्यांना 1.35 लाख रुपयांपर्यंतची ऑफर मिळत आहे. यामध्ये एक लाखापेक्षा जास्त रोख सवलत दिली जात आहे. बोलेरो क्लासिकची किंमत 8.68 लाख रुपयांपासून सुरू होते; तर बोलेरो नियो मॉडेल 8.92 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे.
34
बोलेरो नियोचे नवीन फीचर्स
नवीन बोलेरो नियोमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यात रूफ स्काय रॅक, नवीन फॉग लाइट्स, DRL सह एलईडी हेडलाइट्स आणि स्पेअर व्हील कव्हरसाठी नवीन रंग जोडण्यात आला आहे. इंटिरियरमध्ये ड्युअल-टोन लेदर सीट्स, उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, दोन्ही रांगेत आर्मरेस्ट आणि सिल्व्हर फिनिश सेंटर कन्सोल यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात 7-इंचाची टचस्क्रीन सिस्टीम देखील आहे.
मात्र, यात अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेचा सपोर्ट नाही. ही एक 7-सीटर सब-4 मीटर एसयूव्ही आहे. 1.5-लिटर mHawk100 डिझेल इंजिन 100bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क निर्माण करते. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स हा बाजारात उपलब्ध असलेला एकमेव पर्याय आहे. सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्ज आणि क्रॅश सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.