Baba Vanga: 5079 पर्यंतची भविष्यवाणी, जगात काय काय घडणार? वाचा सविस्तर

Published : Jun 04, 2026, 09:45 PM IST

Baba Vanga: जगातल्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्यांपैकी एक असलेल्या बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बल्गेरियाच्या या अंध भविष्यवेत्त्याने आपल्या आयुष्यात अनेक धक्कादायक भविष्यवाण्या केल्या होत्या, असं म्हटलं जातं.

PREV
14
नवीन ऊर्जा स्रोत

2026 बद्दल काय म्हटलं होतं? बाबा वेंगांच्या नावाने फिरणाऱ्या भविष्यवाणीनुसार, 2026 पर्यंत युरोपची लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. तसेच, मानवजात एक नवीन ऊर्जा स्रोत शोधेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. 2028 पर्यंत मानव एक नवीन ऊर्जा स्रोत विकसित करेल आणि शुक्राच्या दिशेने मानवी मोहीम पाठवेल, असंही त्यांच्या भविष्यवाणीच्या यादीत दिसतं.

24
अर्थव्यवस्थेत मोठे बदल
2033: समुद्राची पातळी वाढणार. हवामान बदलामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढू शकते, असा उल्लेख या भविष्यवाणीत आहे. 2043: जागतिक राजकारणात बदल. 2043 पर्यंत, जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल होऊ शकतात आणि युरोपचे राजकीय चित्रही बदलू शकते, असा उल्लेख काही याद्यांमध्ये आढळतो.
34
सामाजिक व्यवस्थेत मोठे बदल
2046: कृत्रिम अवयवांचे युग. वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होऊन कृत्रिम अवयव सामान्य होतील, असं म्हटलं आहे. यामुळे अवयव प्रत्यारोपण सोपं होऊ शकतं. 2066 आणि त्यानंतरची वर्षे: काही नोंदींनुसार, 2066 मध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रे विकसित केली जातील. 2076 मध्ये सामाजिक व्यवस्थेत मोठे बदल होतील, असंही सांगण्यात आलं आहे.
44
अनेक भविष्यवाण्या
2100 ते 5079 पर्यंत: पुढच्या शतकांमध्ये कृत्रिम सूर्य, परग्रहावरील जीवांसोबत संपर्क, जागतिक दुष्काळ, मंगळ ग्रहावर युद्ध आणि शेवटी 5079 मध्ये जगाचा अंत अशा अनेक आश्चर्यकारक भविष्यवाण्या या यादीत आहेत. पण त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. खरं की केवळ अफवा? बाबा वेंगांच्या नावाने पसरलेल्या अनेक भविष्यवाण्यांना अधिकृत पुरावे नाहीत. त्यामुळे याकडे केवळ उत्सुकतेने पाहणेच योग्य ठरेल.
Read more Photos on

Recommended Stories