Axis Bank Rules : 1 डिसेंबरपासून ॲक्सिस बँकेचे नियम बदलणार, ग्राहकांनो लक्ष द्या

Published : Nov 06, 2026, 04:38 PM IST

ॲक्सिस बँकेत (Axis Bank) बचत खाते असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ डिसेंबरपासून बँकेच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत.

PREV
13
१ डिसेंबरपासून ॲक्सिस बँकेचे नवे नियम लागू

खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेने (Axis Bank) बचत खात्यावरील सेवा शुल्कात बदल जाहीर केले आहेत. हे नवे नियम १ डिसेंबर २०२६ पासून लागू होतील. देशांतर्गत आणि अनिवासी भारतीय (NRI) ग्राहकांच्या विशिष्ट बचत खात्यांना हे नियम लागू असतील. विशेषतः इझी ॲक्सेस (Easy Access), कृषी (Krishi) आणि सहज (Sahaj) बचत खातेधारकांनी याची नोंद घ्यावी.

सध्या या खात्यांवर महिन्याला पहिले चार व्यवहार किंवा १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार मोफत आहेत. पण १ डिसेंबरपासून मोफत व्यवहारांची संख्या ४ वरून ३ करण्यात आली आहे. १ लाखाच्या मर्यादेत कोणताही बदल नाही. त्यामुळे वारंवार पैसे काढणाऱ्या किंवा जमा करणाऱ्या ग्राहकांना आता अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते.

23
मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंड वाढणार

बँक खात्यात किमान सरासरी मासिक शिल्लक (Minimum Balance) न ठेवल्यास ॲक्सिस बँक आता जास्त दंड आकारणार आहे. निमशहरी आणि ग्रामीण शाखांमधील इझी ॲक्सेस खात्यांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे. निमशहरी शाखांमध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त ३०० रुपये दंड होता, तो आता ६०० रुपयांपर्यंत वाढेल. ग्रामीण शाखांमधील १५० रुपयांचा दंडही ६०० रुपये करण्यात आला आहे.

अनिवासी भारतीयांच्या (NRI) खात्यांसाठीही हा दंड ३०० वरून ६०० रुपये झाला आहे. शहरी आणि महानगर शाखांमधील ६०० रुपयांच्या दंडात कोणताही बदल नाही. हा दंड आवश्यक बॅलन्समधील तुटीच्या ६ टक्के दराने आकारला जाईल. पगारदार ग्राहकांना (Salary accounts) हा दंड लागू होणार नाही.

33
चेक बाऊन्स आणि रिवॉर्ड पॉईंट्समध्येही बदल

चेक बाऊन्स झाल्यास आकारले जाणारे शुल्कही बँकेने वाढवले आहे. सध्या पहिल्यांदा चेक बाऊन्स झाल्यास ५० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक वेळी १०० रुपये लागतात. १ डिसेंबरपासून प्रत्येक चेक बाऊन्ससाठी २०० रुपये निश्चित शुल्क लागेल. तसेच, अनिवासी भारतीयांच्या (NRI) बरगंडी (Burgundy), प्रायॉरिटी (Priority), प्रेस्टीज (Prestige) आणि प्राईम (Prime) खात्यांसाठी हे शुल्क ५० वरून थेट ५०० रुपये करण्यात आले आहे.

याशिवाय विशिष्ट खात्यांवरील एज रिवॉर्ड (Edge Rewards) पॉईंट्सही बंद होणार आहेत. तसेच प्रीमियम खात्यांसाठी 'टोटल बँकिंग रिलेशनशिप व्हॅल्यू'ची अट ७५ टक्क्यांवरून १०० टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी १ डिसेंबरपूर्वी हे नवे नियम समजून घेणे फायद्याचे ठरेल, जेणेकरून अनावश्यक भुर्दंड टळेल.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories