Car Insurance : तुमचा कार इन्शुरन्स क्लेम फेटाळला जाऊ नये म्हणून 'या' चुका टाळाच

Published : Sep 14, 2026, 05:22 PM IST
Car Insurance : तुमचा कार इन्शुरन्स क्लेम फेटाळला जाऊ नये म्हणून 'या' चुका टाळाच

सार

गाडीला अपघात झाल्यावर इन्शुरन्स क्लेम नाकारला जाऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. चुकीची माहिती देणं, छोट्या दुरुस्तीसाठी क्लेम करणं किंवा जुनं नुकसान नव्या क्लेममध्ये दाखवणं, यांसारख्या चुकांमुळे तुम्हाला क्लेमची रक्कम गमवावी लागू शकते.

मुंबई : गाडीला अपघात झाल्यावरच आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीचं खरं महत्त्व कळतं. पण अनेकदा आपल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे इन्शुरन्स कंपन्या क्लेम फेटाळून लावतात. त्यामुळे क्लेम करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

या गोष्टींकडे लक्ष द्या

अपघातस्थळावरील पुरावे - अपघात झाल्यावर लगेचच घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा. यामुळे क्लेमची प्रक्रिया सोपी होते.

अचूक माहिती द्या - गाडी खरेदी करताना किंवा इन्शुरन्स घेताना, आधीचे क्लेम्स, नो क्लेम बोनस (NCB), गाडीची मालकी आणि गाडीत केलेले बदल यांसारखी सर्व माहिती अगदी बरोबर द्या. चुकीची माहिती हे क्लेम नाकारण्याचं एक प्रमुख कारण आहे.

झीरो डेप्रिसिएशन कव्हरेज - तुमच्याकडे झीरो डेप्रिसिएशन ॲड-ऑन असलं तरी, गाडीच्या वापरामुळे होणाऱ्या सामान्य झीजेला (wear and tear) कव्हरेज मिळत नाही. इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक ऑइल, नट, बोल्ट यांसारख्या गोष्टींसाठी वेगळा ॲड-ऑन घ्यावा लागतो. तसेच, इंजिन आणि टायरच्या संरक्षणासाठीही वेगळं कव्हरेज गरजेचं आहे.

छोट्या दुरुस्तीसाठी क्लेम करू नका - जर तुम्ही छोट्या-छोट्या दुरुस्तीसाठी क्लेम केला, तर तुमचा 'नो क्लेम बोनस' (NCB) जातो. इन्शुरन्स रिन्यू करताना जिथे तुम्हाला NCB मुळे 12,000 ते 15,000 रुपयांची सूट मिळू शकते, तिथे 8,000 ते 10,000 रुपयांच्या दुरुस्तीसाठी क्लेम करण्याऐवजी स्वतःच्या खिशातून पैसे भरणं जास्त फायद्याचं ठरतं. पण जर खर्च 50,000 रुपयांसारखा मोठा असेल, तर नक्कीच क्लेम करा.

जुनं नुकसान नवीन क्लेममध्ये दाखवू नका - नव्या अपघाताच्या क्लेममध्ये जुने ओरखडे किंवा नुकसान दाखवण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा संपूर्ण क्लेम रद्द होऊ शकतो. सर्वेअरना (Surveyors) जुनं आणि नवं नुकसान ओळखता येतं.

जुनी गाडी खरेदी करताना - जेव्हा गाडीची मालकी बदलते, तेव्हा थर्ड-पार्टी इन्शुरन्स आपोआप नवीन मालकाच्या नावावर जातो. पण स्वतःच्या गाडीच्या नुकसानीसाठी असलेलं कव्हरेज (Own Damage) नवीन मालकाच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यावं लागतं.

गाडी चोरीला गेल्यास - गाडी चोरी झाल्यास त्वरित पोलिसांत एफ.आय.आर. (FIR) दाखल करा आणि इन्शुरन्स कंपनी व आर.टी.ओ. (RTO) यांनाही कळवा. आर.सी. बुकची मूळ प्रत आणि गाडीच्या चाव्या जमा करण्यास उशीर केल्यास प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.

टोटल लॉस (Total Loss) वाहनं - अपघातात गाडीचं पूर्ण नुकसान झालं (Total Loss) तरी, तिच्या भंगार मालाला (scrap) किंमत असते. तुम्ही कंपनीच्या मदतीने किंवा स्वतःहून ते विकू शकता.

थर्ड-पार्टी आणि पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर - थर्ड-पार्टी इन्शुरन्स तुमच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला किंवा त्यांच्या मालमत्तेला झालेल्या नुकसानीसाठी असतो. 'ओन-डॅमेज' (On-Damage) पॉलिसी तुमच्या स्वतःच्या गाडीचं संरक्षण करते. मालक/ड्रायव्हरसाठी 15 लाख रुपयांचं पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर असतं, ज्यासाठी 750 रुपये वार्षिक प्रीमियम अनिवार्य आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

DMart Shopping : 1000 रुपयांच्या खरेदीला जाता आणि 3000 चं बिल कसं होतं? सुपरमार्केटचं सिक्रेट!
Mobile Recharge : सर्वसामान्यांना पुन्हा फटका.. मोबाईल रिचार्ज किती महागणार माहितीये का?