Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, काही खास महिन्यांत जन्मलेल्या लोकांसाठी एप्रिल महिना खूपच भाग्यशाली ठरणार आहे. त्यांना उत्तम संधी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया, कोणत्या महिन्यात जन्मलेल्यांसाठी एप्रिल महिना खास असणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी, मार्च, जुलै आणि नोव्हेंबर या महिन्यांत जन्मलेल्या लोकांना एप्रिल महिन्यात विशेष लाभ मिळतील. याचं कारण म्हणजे, एप्रिलमध्ये सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, तर गुरु आणि शुक्र अनुकूल स्थितीत असतील. या शुभ ग्रहस्थितीमुळे या चार महिन्यांत जन्मलेल्यांसाठी काळ उत्तम राहील, असं ज्योतिष तज्ज्ञांचं मत आहे.
25
जानेवारी, मार्चमध्ये जन्मलेले
जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक शिस्तप्रिय आणि मेहनती असतात. यांना एप्रिल महिन्यात नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. त्यांची पूर्वीची रखडलेली कामं या महिन्यात पूर्ण होतील. तर मार्च महिन्यात जन्मलेले लोक सर्जनशील आणि भावनाप्रधान असतात. एप्रिल महिन्यात त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप मिळेल. कला, लेखन आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना चांगली ओळख मिळेल आणि ते आपले ध्येय साध्य करतील.
35
जुलै, नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले
जुलै महिन्यात जन्मलेले लोक कुटुंबाला जास्त महत्त्व देतात. यांना एप्रिल महिन्यात कुटुंबात आनंदाचे क्षण अनुभवता येतील आणि आर्थिक स्थैर्यही वाढेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नशीब पूर्णपणे त्यांची साथ देईल. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक धाडसी आणि आत्मविश्वासू असतात. एप्रिल महिन्यात त्यांना नवीन निर्णय घेण्याचं धैर्य मिळेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि बऱ्याच काळापासून वाट पाहत असलेल्या संधी उपलब्ध होतील. आर्थिकदृष्ट्या काळ अनुकूल राहील.
एवढंच नाही, तर एप्रिल महिन्यात चंद्राचं संक्रमण अनुकूल असल्यामुळे या चार महिन्यांत जन्मलेल्या लोकांची मानसिक शांतता वाढेल. त्यामुळे ते अधिक स्पष्टपणे निर्णय घेऊ शकतील. तसंच, शनीचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पूर्वीचे अडथळे या महिन्यात दूर होतील.
55
या उपायांमुळे मिळतील चांगले परिणाम
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या चार महिन्यांत जन्मलेल्या लोकांनी रोज सकाळी सूर्यनमस्कार करणं, दानधर्म करणं, गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालणं आणि शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करणं, यांसारख्या उपायांमुळे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. रोज ध्यानधारणा करणं आणि सकारात्मक विचार ठेवणंही महत्त्वाचं आहे. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगून अनावश्यक खर्च टाळल्यास या शुभ काळाचा पुरेपूर फायदा घेता येईल, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.