Storage Cabinet Designs: मोठ्या शहरांमधल्या फ्लॅट्समध्ये किचन खूपच लहान असतात. त्यामुळे सामान ठेवायला जागाच पुरत नाही. पण योग्य कॅबिनेट बनवून घेतल्यास आपण भरपूर स्टोरेज मिळवू शकतो. एक नजर टाकूया या कॅबिनेटसच्या डिझाईन्सवर
लहान किचनमध्ये पसारा जास्त असल्यामुळे काम करायलाही कंटाळा येतो. पण काही मॉडर्न कॅबिनेट डिझाइन्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या लहानशा किचनला स्मार्ट, स्वच्छ आणि भरपूर स्टोरेज असलेलं बनवू शकता. योग्य रंगाचे आणि डिझाइनचे कॅबिनेट तुमच्या किचनचा लुकच बदलून टाकतात. चला, पाहूया काही जबरदस्त डिझाइन्स, जे तुमच्या लहान किचनलाही मोठा आणि ऑर्गनाइज्ड लुक देतील.
25
लहान किचनसाठी मॉड्यूलर पुल-आउट कॅबिनेट्स
लहान किचनसाठी मॉड्यूलर पुल-आउट कॅबिनेट्स (Pull-Out Cabinets) हा एक स्मार्ट स्टोरेज सोल्यूशन आहे. यात स्लाइडिंग ड्रॉवर्स असतात, जे तुम्ही सहज बाहेर ओढू शकता. यामध्ये तुम्ही भांडी, मसाले आणि किराणा सामान ठेवून किचन एकदम स्वच्छ ठेवू शकता.
35
व्हर्टिकल स्टोरेज कॅबिनेट
तुमच्या किचनमध्ये जमिनीवर जागा कमी असेल, तर उंचीचा वापर करा. म्हणजे, व्हर्टिकल स्टोरेज कॅबिनेट (Vertical Cabinets) बनवा. छतापर्यंत जाणारे हे कॅबिनेट भरपूर स्टोरेज देतात. किचनला स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही कॅबिनेटमध्ये फ्लूटेड ग्लास लावू शकता आणि लाईट्सच्या मदतीने त्याला अधिक रॉयल लुक देऊ शकता.
जर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये ओपन आणि क्लोज, दोन्ही प्रकारचे कॅबिनेट हवे असतील, तर तुम्ही हे डिझाइन पाहू शकता. यात वरच्या आणि खालच्या बाजूला बंद कॅबिनेट आहेत, तर मधला भाग मोकळा ठेवला आहे. इथे तुम्ही रोजच्या वापरातील वस्तू ठेवू शकता किंवा एखादी शो-पीस ठेवून किचनची शोभा वाढवू शकता.
55
किचनला द्या प्रीमियम आणि मॉडर्न लुक
ओपन किचनला प्रीमियम आणि मॉडर्न लुक देण्यासाठी तुम्ही हे डिझाइन पाहू शकता. पेस्टल शेड्स, जसे की ग्रे, पिंक आणि मिंट ग्रीन, यांचं सुंदर कॉम्बिनेशन किचनला एक सॉफ्ट आणि एलिगेंट फील देतं. हँडललेस कॅबिनेट्स आणि क्लीन फिनिशमुळे किचन मिनिमल आणि स्टायलिश दिसतं. वरचे बंद कॅबिनेट आणि खालचे ड्रॉवर्स स्मार्ट स्टोरेजसाठी परफेक्ट आहेत.