
कॅलिफोर्निया: ॲपलच्या इतिहासातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, आयफोन फोल्ड (iPhone Fold), 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. A20 प्रो चिप आणि C2 मॉडेमसह येणाऱ्या आयफोन फोल्डमध्ये आणखी काय अपेक्षित आहे? आयफोन फोल्डबद्दल आतापर्यंत समोर आलेली माहिती येथे वाचा.
लीक्सनुसार, ॲपल सप्टेंबर 2026 मध्ये आयफोन फोल्ड सादर करेल. हे लाँच आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्ससोबतच होईल. आयफोन फोल्डमध्ये 2nm वर आधारित नवीन A20 प्रो चिप आणि ॲपलचे दुसऱ्या पिढीचे C2 मॉडेम असण्याची शक्यता आहे. हे दोन्ही घटक आयफोन 18 प्रो लाइनअपमध्ये देखील अपेक्षित आहेत. फोल्डेबल आयफोनसाठी ॲल्युमिनियम आणि टायटॅनियमपासून बनवलेली बॉडी वापरली जाईल, असे संकेत आहेत. आयफोन फोल्डमध्ये 7.8-इंचाचा फोल्डिंग इनर स्क्रीन आणि 5.3-इंचाचा कव्हर डिस्प्ले अपेक्षित आहे. फोल्डेबल आयफोनमध्ये फेस आयडीऐवजी टच आयडी असेल, अशीही चर्चा आहे.
आयफोन फोल्डमध्ये 48-मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा असेल, अशी अपुष्ट माहिती आहे. यात 48MP चा प्रायमरी सेन्सर आणि 48MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. बहुतेक हेच सेन्सर आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्समध्येही असतील. मात्र, आयफोन 18 प्रो मॉडेल्समध्ये व्हेरिएबल ॲपर्चर असेल.
कव्हर स्क्रीन: 5.3-इंच
फोल्डिंग स्क्रीन: 7.8-इंच
प्रोसेसर: A20 प्रो चिप
रिअर कॅमेरा: 48MP प्रायमरी + 48MP अल्ट्रा-वाइड
फ्रंट कॅमेरा: 18MP (कव्हर स्क्रीन) + 18MP (फोल्डिंग स्क्रीन)
चेसिस: टायटॅनियम + ॲल्युमिनियम
मॉडेम चिप: ॲपल C2.