Airtel Postpaid Plans : एअरटेलचे पोस्टपेड प्लॅन्स 50 रुपयांनी महागले, पण मिळणार 5GB फ्री रोमिंग

Published : Oct 07, 2026, 12:56 PM IST
Airtel Postpaid Plans : एअरटेलचे पोस्टपेड प्लॅन्स 50 रुपयांनी महागले, पण मिळणार 5GB फ्री रोमिंग

सार

एअरटेलने आपल्या पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. हे नवीन प्लॅन्स ८ ऑक्टोबरपासून लागू होतील. यात ग्राहकांना दरवर्षी एक फ्री इंटरनॅशनल रोमिंग ट्रिप मिळेल, ज्यामध्ये ५ दिवसांसाठी 5GB डेटा, ६० मिनिटे कॉलिंग आणि २५ एसएमएस मिळतील.

मुंबई : भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमती ५० रुपयांनी वाढवल्या आहेत. पण या वाढीसोबतच ग्राहकांना आता इंटरनॅशनल रोमिंगचा एक नवीन फायदा मिळणार आहे. एअरटेलचे हे नवीन पोस्टपेड प्लॅन्स ८ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होतील. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या पोस्टपेड ग्राहकांना एका महिन्याच्या आत त्यांच्या जवळच्या वरच्या प्लॅनवर शिफ्ट केलं जाईल.

एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये काय बदलणार?

सर्वात मोठा बदल म्हणजे आता ग्राहकांना दरवर्षी एक फ्री इंटरनॅशनल रोमिंग ट्रिप मिळणार आहे. एअरटेलच्या मते, या फ्री रोमिंग बेनिफिटची किंमत २,००० रुपये आहे.

ग्राहक त्यांच्या सोयीनुसार हा फ्री रोमिंग पॅक कधीही ॲक्टिव्हेट करू शकतात. याची व्हॅलिडिटी ५ दिवसांची असेल. यात 5GB डेटा, ६० मिनिटांचे कॉलिंग आणि २५ आऊटगोईंग एसएमएस मिळतील. तसेच, इनकमिंग एसएमएस पूर्णपणे फ्री असतील.

जे ग्राहक एअरटेलचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन वापरतात, त्यांच्यासाठी हा फायदा फक्त प्रायमरी अकाउंट होल्डरपुरता मर्यादित नसेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या फ्री इंटरनॅशनल रोमिंग ऑफरचा लाभ घेता येईल.

एअरटेलच्या दरवाढीचं गणित समजून घ्या

थोडक्यात सांगायचं तर, एअरटेलच्या या नवीन पोस्टपेड प्लॅन्समध्ये सध्याच्या प्लॅन्सच्या तुलनेत ५० रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीने स्पष्ट केलंय की, जुने सर्व फायदे तसेच राहतील, फक्त त्यात आता इंटरनॅशनल रोमिंगची भर पडली आहे.

याशिवाय, फास्ट लेन टेक्नॉलॉजी, अनलिमिटेड डेटा आणि स्पॅम किंवा फेक लिंक्सपासून नेटवर्क लेव्हलवर मिळणारी सुरक्षा हे फीचर्स एअरटेल पुढेही सुरू ठेवणार आहे.

मनोरंजनाचे फायदेही कायम

या टेलिकॉम कंपनीच्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये एंटरटेनमेंट सबस्क्रिप्शन आणि 'एअरटेल पोस्टपेड ॲडव्हांटेज क्लब'चा ॲक्सेस आधीसारखाच मिळेल.

या क्लबच्या मेंबर्सना कॉमेडी शोज, मुव्ही प्रीमियर आणि कॉन्सर्ट्ससारख्या इव्हेंट्सचा आनंद घेता येईल.

जे लोक कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी वारंवार परदेशात जातात, त्यांच्यासाठी हे नवीन प्लॅन्स खूप फायद्याचे आहेत. प्रत्येक ट्रिपसाठी वेगळा रोमिंग पॅक घेण्याऐवजी, आता त्यांच्या मंथली प्लॅनमध्येच त्यांना रोमिंगची सुविधा मिळेल.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Purple Potato: कुफरी जामुनिया! देशातील कुपोषण संपवण्यासाठी आलाय 'पर्पल बटाटा'
SBI Credit Card: एसबीआय क्रेडिट कार्ड वापरताय? 1 डिसेंबरपासून या व्यवहारांवर लागणार एक्स्ट्रा चार्ज