एअर इंडियाच्या प्रवाशांना आता आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. पण आता देशाअंतर्गत विमानसेवेतही इंटरनेटचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.
Air India Free Wifi Service : नव्या वर्षात एअर इंडिया कंपनीने आपल्या प्रवाशांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने देशाअंतर्गत विमानसेवेत प्रवाशांना मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देणारी एअर इंडिया कंपनी भारतातील पहिली एअरलाइन ठरली आहे. एअरबस ए 321 नियो विमानातील प्रवाशांना 10 हजार फूट उंचीवर असतानाही इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे.
एअर इंडियाची मोफत इंटरनेट सुविधा न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि सिंगापुरसारख्या देशांसाठी आधीपासूनच उपलब्ध करुन दिली होती. पण आता देशाअंतर्गत कंपनीच्या उड्डाणांमध्येही प्रवाशांना मोफत इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे की, वाय-फाय सुविधेचा लाभ लॅपटॉप, टॅबलेट आणि आयओएस किंवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन युजर्सला घेता येमार आहे.
एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरियंस ऑफिसर राजेश डोगरा यांनी म्हटले की, कनेक्टिव्हिटी आता आधुनिक प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आमच्या विमानसेवेचे प्रवासी कौतुक करतील आणि एअर इंडियाच्या नव्या अनुभवाचा आनंद घेतील.
आणखी वाचा :
तुमच्या आधार कार्डवर किती SIM Card रजिस्टर्ड? असे काढा शोधून
WhatsApp वर करता येणार कॉल शेड्यूल, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस