पैसा वाढवायचा असेल तर हे 7 गुंतवणूकीचे नियम लक्षात ठेवा

Published : Jul 13, 2026, 02:08 PM IST
Investment Tips

सार

प्रत्येकजण आपल्या पगारातील काही रक्कम गुंतवणूक करतो. पण गुंतवणूकीचे काही नियम प्रत्येकाला माहिती असावेत. जेणेकरुन तुम्ही गुंतवणूकीसह आर्थिक मजबूतही होऊ शकता.

मुंबई : आजच्या काळात बचत आणि गुंतवणूक करणे जितके महत्त्वाचे आहे. पण त्यासोबतच आर्थिक नियोजन करणे देखील महत्वाचे आहे. अनेकजण शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र किती पैसे गुंतवायचे, किती सेव्हिंग करायची आणि आपत्कालीन स्थितीसाठी किती रक्कम राखून ठेवायची याबाबत अनेकांना संभ्रम असतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, काही सोपे नियम पाळल्यास आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. 

 पैसा वेगाने वाढू शकतो?

गुंतवणूक करताना प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की, आपल्या पैशांमध्ये किती वर्षांनी वाढले जातील. तज्ज्ञांच्या मते, उत्तम रिटर्न्स मिळणाऱ्या गुंतवणुकीत दीर्घकाळ पैसे गुंतवून ठेवावे लागतात. जेणेकरुन रक्कम हळूहळू दुप्पट, तिप्पट किंवा चौपट होऊ शकते. अशातच गुंतवणुक करताना संयम ठेवणे फार महत्वाचे आहे.

उत्पन्नाचे योग्य नियोजन कसे करावे?

आर्थिक तज्ज्ञ सांगतात की, संपूर्ण पगार खर्च करण्याऐवजी त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा काही भाग घरखर्च आणि आवश्यक गरजांसाठी, काही भाग वैयक्तिक आवडी-निवडींसाठी आणि उर्वरित भाग बचत व गुंतवणुकीसाठी राखून ठेवावा.

वयानुसार गुंतवणुकीची रणनीती बदला

तरुण वयात रिस्क घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे तरुण वयापासूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला बहुतांशवेळा दिला जातो. यासोबत वय वाढण्यासह सुरक्षित गुंतवणूक कशी करावी याची समज येऊ लागते. वयानुसार गुंतवणुकीचे प्लॅन तयार करणे आवश्यक आहे. 

नियमित गुंतवणुकीची सवय लावा

मोठी रक्कम जमा झाल्यावरच गुंतवणूक करावी असे नाही. दर महिन्याला पगारातील काही भाग नियमितपणे गुंतवा. जेणेकरुन कालांतराने पैशांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर उत्पन्न वाढेल तसे गुंतवणुकीची रक्कमही वाढवत नेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

आपत्कालीन निधी महत्वाचा

आर्थिक नियोजनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपत्कालीन निधी. अचानक नोकरी जाणे, गंभीर आजारपण, अपघात किंवा इतर अनपेक्षित खर्चाच्या वेळी हा निधी मोठा आधार ठरतो. त्यामुळे किमान काही महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम वेगळी ठेवणे आवश्यक मानले जाते.

आर्थिक शिस्तही महत्त्वाची

फक्त गुंतवणूक करून चालत नाही, तर खर्चावर नियंत्रण, नियमित बचत आणि दीर्घकालीन नियोजन यांनाही तितकेच महत्त्व आहे. योग्य आर्थिक सवयी फॉलो केल्यास भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे सहज गाठता येऊ शकतात.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Blouse Designs: बॅकलेसचा हटके अंदाज, शिवून घ्या हे ५ डोरी डिझाइन ब्लाउज
गाडी जेवढी किलोमीटर चालेल तेवढाच भरा विम्याचा प्रीमियम, जाणून घ्या माहिती